coronavirus: गोव्यात कोरोनामुळे आणखी एका महिलेचा मृत्यू, एकूण संख्या 15
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 08:19 AM2020-07-13T08:19:23+5:302020-07-13T08:19:36+5:30
सोमवारी पहाटे मरण पावलेली महिला ही दक्षिण गोव्यातील मुरगाव तालुक्यातील मांगोर येथील आहे.
पणजी : जो गोवा अडिच महिन्यांपूर्वी कोविडबाबत पूर्ण सुरक्षित मानला जात होता, त्याच गोव्यात कोविडग्रस्तांचे मोठ्या संख्येने मृत्यू सुरू आहेत. सोमवारी पहाटे आणखी एका महिलेचा कोविड इस्पितळात मृत्यू झाला. यामुळे मृत व्यक्तींची एकूण संख्या पंधरा झाली
आहे.गेल्या दोन दिवसांत सहा व्यक्तींचा कोविडने बळी घेतला आहे. सोमवारी पहाटे मरण पावलेली महिला ही दक्षिण गोव्यातील मुरगाव तालुक्यातील मांगोर येथील आहे.
मीरा शर्मा नावाची ही 47 वर्षीय महिला आणखी एका आजाराने त्रस्त होती. तिला कोरोनाची लागण झाल्यानंतर गेल्या 6 जुलै रोजी कोविड इस्पितळात आणले गेले होते. आयसीयूमध्ये तिच्यावर उपचार सुरू होते. ती मरण पावल्याचे सोमवारी सरकारमधील उच्चस्तरीय सुत्रांनी सांगितले. आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी या माहितीला दुजोरा दिला.
गोव्यात कोविडग्रस्तांची संख्या एकूण अडिच हजार झाली आहे. यापूर्वी 31 वर्षांचा युवकही कोविडमुळे मरण पावला आहे. गोव्यात 9 कंटेनमेन्ट झोन आहेत. मांगोरहीलचा भागही कंटेनमेन्ट झोनमध्ये येतो व तिथेच सर्वाधिक रुग्ण आहेत. गोव्यात पंधरा बळी गेल्याने भीतीचे वातावरण आहे.