Coronavirus: गोव्यात दहावीच्या परीक्षा रद्द, मुख्यमंत्र्यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 09:22 AM2021-05-24T09:22:24+5:302021-05-24T09:22:53+5:30
Class X exams: दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अंतर्गत गुणांवर आधारित पुढील वर्गात प्रवेश दिला जाईल. अंतर्गत गुण कमी असल्यास आणि एखाद दुसरा विषय राहत असल्यास एटीकेटीची मुभा असेल
पणजी : कोविडमुळे राज्यात लांबणीवर टाकलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत, तर बारावीच्या परीक्षांबाबत येत्या बुधवारपर्यंत निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रविवारी जाहीर केले.
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अंतर्गत गुणांवर आधारित पुढील वर्गात प्रवेश दिला जाईल. अंतर्गत गुण कमी असल्यास आणि एखाद दुसरा विषय राहत असल्यास एटीकेटीची मुभा असेल.सावंत म्हणाले की, बारावीच्या परीक्षांबाबत अजून निर्णय झालेला नाही. जेईई, नीट परीक्षांबाबत केंद्र सरकार येत्या दोन दिवसांत निर्णय घेणार आहे. त्यानंतर बुधवारपर्यंत बारावीच्या परीक्षांबाबत राज्य सरकार निर्णय घेईल.इयत्ता अकरावीत प्रवेशाबाबत विज्ञान आणि पदविका क्षेत्रात चढाओढ होणार आहे. त्यामुळे एका दिवसाची तीन तासांची ऑब्जेक्टिव्ह परीक्षा घेऊनच या शाखांसाठी प्रवेश दिला जाईल. अंतर्गत गुण कमी असल्यास आणि एखाद दुसरा विषय राहत असल्यास एटीकेटीची मुभा असेल.