coronavirus: गोव्यात कोरोना बळींचे शतक पार, आज आणखी ६ जणांचे निधन ; सक्रिय रुग्णसंख्या ३७६0
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2020 09:08 PM2020-08-16T21:08:26+5:302020-08-16T21:09:41+5:30
राज्यात कोविड पॉझिटिव्ह रुग्ण आढळण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.
पणजी - गोव्यात 'कोरोना'मुळे आज रविवारी आणखी ६ जणांचे मृत्यू झाले असून आतापर्यंतच्या एकूण बळींचा आकडा शतक ओलांडून १0४ झाला आहे. एकूण कोविड बाधितांची संख्या ११,६३९ असून सक्रीय रुग्ण ३७६0 आहेत. कोविड पॉझिटिव्हमुळे होणाऱ्या मृत्युने मुरगांव तालुक्यात थैमान घातले आहे. आतापर्यंत वास्को आणि परिसरातच सर्वात जास्त रुग्ण दगावले आहेत. राज्यात कोविड पॉझिटिव्ह रुग्ण आढळण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.
पणजी येथील ६0 वर्षीय इसमाचे वास्कोतील साळगांवकर मेडिकल रीसर्च सेंटर इस्पितळामध्ये निधन झाले. चिंबल येथील ३६ वर्षीय युवकाचे गोमेकॉत, फोंडा येथील एक महिलेचे, मडगांव येथील ८९ वर्षीय वृध्दाचे, दवर्ली येथील ३९ वर्षीय युवकाचे आणि घोगळ, मडगांव येथील ६६ वर्षीय वृध्दाचे मडगांवच्या ईएसआय इस्पितळात निधन झाले.
जुलै महिना गोमंतकीयांसाठी घात महिना ठरला. कोविडचे आतापर्यंत जे बळी गेले आहेत त्यातील बहुतांश मृत्यू जुलै महिन्यात झालेले आहेत.
कोविड आता गोव्याच्या कानाकोपºयात पोचला असून दररोज सरासरी ३00 पेक्षा अधिक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. गेल्या आठवड्यात एकाच दिवशी तब्बल ५७0 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. एकाच दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणात कोविड बाधित आढळण्याची आतापर्यंतची ही सर्वात विक्रमी संख्या आहे. त्यामुळे पुढे आणखी कोणत्या परिस्थितीला सामारे जावे लागेल याबाबत लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.