coronavirus: गोव्यात कोरोनामुळे आणखी पाच जणांचा मृत्यू, नवे 339 रुग्ण आढळले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 08:11 PM2020-08-18T20:11:01+5:302020-08-18T20:11:54+5:30
गोव्यात ज्या पाचजणांचे कोविडमुळे चोवीस तासांत मृत्यू झाले त्यात माहिती खात्याच्या एका अधिका-याचाही समावेश आहे.
पणजी : राज्यात कोविडमुळे मंगळवारी आणखी पाच रुग्णांचे निधन झाले. एकूण 339 नवे रुग्ण आढळले. मडगाव रुग्णालयाच्या क्षेत्रत सर्वाधिक म्हणजे 519 कोविडग्रस्त व्यक्ती सध्या आहेत. वास्कोच्या क्षेत्रलाही मडगावने याबाबत मागे टाकले आहे. वास्कोला 365 कोविड रुग्ण आहेत. म्हणजेच मांगोरहील वगैरे भागात रुग्णसंख्या खूप कमी झाली आहे.
ज्या पाचजणांचे कोविडमुळे चोवीस तासांत मृत्यू झाले त्यात माहिती खात्याच्या एका अधिका-याचाही समावेश आहे. मंगळवारी 298 कोविडग्रस्त आजारातून बरे झाले. आतार्पयत एकूण 12 हजार 333 व्यक्तींना कोविडची लागण झाली व त्यापैकी 8 हजार 356 कोविडग्रस्त आजारातून बरे झाले. मात्र 116 व्यक्तींचे प्राण गेले. राज्यात सध्या 3 हजार 861 सक्रिय कोविड रुग्ण आहेत.
आके बायश येथील 57 वर्षीय इसमाचा कोविडने जीव घेतला. मडगाव येथील 75 वर्षीय पुरुष रुग्णाचा बळी गेला. बोरी येथील 72 वर्षीय व्यक्तीचा कोविडमुळे मृत्यू झाला. फोंडा येथील 57 वर्षीय कोविड रुग्णाचा जीव गेला. बायणा येथील 66 वर्षीय पुरुष रुग्णाला मडगावच्या कोविड इस्पितळात दाखल करण्यात आले होते. त्याचीही प्राणज्योत गेल्या चोवीस तासांत मालवली.
मडगावच्या रुग्णालयाच्या क्षेत्रत जेवढे कोविड रुग्ण सध्या आहेत, तेवढे अन्य शहरांमध्ये नाहीत. साखळी रुग्णालयाच्या क्षेत्रत 120 व्यक्ती कोविडग्रस्त आहेत तर पेडणोत 171 व्यक्तींना कोविडची लागण झाली आहे. वाळपई व परिसरात संख्या 148 झाली आहे. म्हापशात संख्या 125 आहे तर पणजी रुग्णालयाच्या क्षेत्रत संख्या 189 आहे. चिंबल प्राथमिक आरोग्य केंद्राच्या क्षेत्रत संख्या 223 आहे तर पर्वरी आरोग्य केंद्राच्या क्षेत्रत संख्या 152 आहे. केपे आरोग्य केंद्राच्या क्षेत्रत संख्या 9क् आहे तर शिरोडा आरोग्य केंद्राच्या क्षेत्रत संख्या 64 आहे. फोंडा रुग्णालयाच्या क्षेत्रत 2क्8 रुग्ण आहेत.