CoronaVirus : परराज्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी कृती योजना तयार करा - दिगंबर कामत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 11:22 PM2020-04-27T23:22:11+5:302020-04-27T23:23:06+5:30

CoronaVirus : वाळपईच्या नवोदय विद्यालयाचे १३ विद्यार्थी दिल्लीत अडकले आहेत.

CoronaVirus: Create an action plan to bring back students - Digambar Kamat | CoronaVirus : परराज्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी कृती योजना तयार करा - दिगंबर कामत

CoronaVirus : परराज्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी कृती योजना तयार करा - दिगंबर कामत

Next

पणजी : देशभरात ठिकठिकाणी शिक्षणासाठी असलेल्या आणि लॉकडाउनमुळे अडकलेल्या गोमंतकीय विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारकडे बोलून कृती योजना तयार करावी तसेच सहलीवर गेलेले काही विद्यार्थीही अडकले आहेत त्यांनाही परत आणावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केली आहे. 

शनिवारी मुख्यमंत्री सावंत यांनी असे म्हटले होते की, देशात ठिकठिकाणी अडकलेल्या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिका-यांची परवानगी घेऊन गोव्यात येता येईल. परंतु येथे आल्यानंतर त्यांना १४ दिवस क्वारंटाइन रहावे लागेल. यावर कामत यांनी मुख्यमंत्र्यांचा हा निर्णय स्वागतार्ह असल्याचे म्हटले आहे. गेले ४३ दिवस गोव्यातील विद्यार्थी परराज्यात अडकून पडलेले आहेत. 

दरम्यान, वाळपईच्या नवोदय विद्यालयाचे १३ विद्यार्थी दिल्लीत अडकले आहेत. तर विद्यार्थी देवणा घेवाण उपक्रमांतर्गत गोव्यात आलेले मंगेशपूर, दिल्लीच्या नवोदय विद्यालयाचे इयत्ता नऊवीचे १८ विद्यार्थी येथे अडकले आहेत. पुणे येथे उच्च शिक्षणासाठी गोव्यातील शेकडो विद्यार्थी आहेत. २२ मार्चच्या देशव्यापी कर्फ्युनंतर लगेच लॉकडाउन जाहीर झाल्याने या विद्यार्थ्यांना गोव्यात येता आले नाही. देशाच्या अन्य भागांमध्येही गोमंतकीय विद्यार्थी अडकलेले आहेत आणि ते मदतीची अपेक्षा करीत आहेत. 

Web Title: CoronaVirus: Create an action plan to bring back students - Digambar Kamat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.