Coronavirus : कोरोना इफेक्ट! घरकाम करणाऱ्या महिला झाल्या मासे विक्रेत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 01:10 PM2020-04-24T13:10:14+5:302020-04-24T13:18:08+5:30
Coronavirus : उपजीविकेचे साधन म्हणून या महिलांनी मासेविक्रीच्या नव्या व्यवसायाकडे वळणे पसंत केले आहे. अचानक कोरोना संकट काळात राज्यात मासेविक्रेत्यांची संख्या वाढली आहे.
पणजी - राज्यात कोरोनाने अनेक बदल घडवून आणणे सुरू केले आहे. बहुतेक कुटूंबांनी घरकाम करणाऱ्या महिलांना सेवेतून कमी केले आहे. अशावेळी उपजीविकेचे साधन म्हणून या महिलांनी मासेविक्रीच्या नव्या व्यवसायाकडे वळणे पसंत केले आहे. अचानक कोरोना संकट काळात राज्यात मासेविक्रेत्यांची संख्या वाढली आहे.
शहरांमध्ये एकच मोलकरीण पाच-सहा घरांमध्ये दिवसाला तास-दोन तास काम करून येते अशी अनेक उदाहरणे होती पण आता घरकामाला सध्या तरी कुणी नको अशी भूमिका अनेक कुटूंबांनी घेतली. लॉकडाऊनच्या काळात आम्हीच आमच्या घरची कामे करतो, असे अनेक कुटूंबांनी सांगितले. अनेकजण लॉकडाऊनच्या काळात स्वयंपाक करायला शिकले. अशावेळी मोलकरणी बेरोजगार झाल्या. त्यामुळे त्यांनी उपजिविकेसाठी तूर्तास अन्य पर्याय निवडले आहेत.
मासळी विकणे हा बहुतेक महिलांनी मुख्य पर्याय स्वीकारला आहे. म्हापसा, मडगाव, फोंडा, पणजी, पर्वरी, वास्को, साखळी, डिचोली, माशेल, वाळपई, काणकोण, कुडचडे आदी अनेक भागांमध्ये मासळी विकण्याच्या व्यवसायात नव्या महिला दिसून लागल्या आहेत. लॉकडाऊनच्या काळात लोकांना मासे घेऊन कोणी घरापर्यंत आलेले हवे असते. मासळीचे दर वाढलेले आहेत. अनेक महिला मासळी विकत काही भागांमध्ये फिरतात तर काही महिला ठराविक ठिकाणी मासे विकत बसलेल्या दिसून येतात. ताळगावच्या पट्टय़ात अनेक महिला भाजी विक्रीच्याही कामात शिरल्या आहेत. मोलकरणीचे काम आता राहिलेले नसल्याने ताळगावच्या पट्टय़ात महिला भाजी विकताना दिसून येतात. काही महिला मात्र पूर्वीपासूनच भाजी विकत होत्या. ताळगावला रस्त्याच्या बाजूच्या शेतातील ताजी भाजी प्राप्त होते.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : कौतुकास्पद! लॉकडाऊनमध्ये पाणी टंचाई, विद्यार्थ्यांनी 4 दिवसांत खोदली विहीर
Coronavirus : आनंदाची बातमी! आणखी एक राज्य कोरोनामुक्त, मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा
Coronavirus : धक्कादायक! एकाच ATMमध्ये गेलेल्या 3 जवानांना कोरोनाची लागण
Coronavirus : अमेरिकेत कोरोनाचे थैमान! कोरोनाग्रस्तांचा आकडा 8 लाखांवर, 49,845 जणांचा मृत्यू