CoronaVirus: गोव्यात कोरोनानं संसर्गामुळे चौथा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2020 09:13 AM2020-07-01T09:13:13+5:302020-07-01T09:13:30+5:30
ताप आल्याने व अस्वस्थ वाटू लागल्याने या इसमाला कोविड इस्पितळात गेल्या आठवड्यात दाखल केले होते. तो आयसीयूमध्येही होता.
पणजी : गोव्यात कोरोनामुळे बुधवारी आणखी एकाचा मृत्यू झाला. यामुळे मडगावच्या कोविड इस्पितळात उपचार घेताना मरण आलेल्या रुग्णांची संख्या एकूण चार झाली आहे. मृत्युमुखी पडलेली 64 वर्षीय व्यक्ती ताळगाव येथील आहे. ताप आल्याने व अस्वस्थ वाटू लागल्याने या इसमाला कोविड इस्पितळात गेल्या आठवड्यात दाखल केले होते. तो आयसीयूमध्येही होता.
गोवा राज्य कोविडबाबत दीड महिन्यापूर्वी खूप सुरक्षित मानले जात होते पण आता एकूण रुग्ण संख्या तेराशेहून जास्त झाल्याने भीतीचे वातावरण आहे. रोज सरासरी 50 नवे रुग्ण आढळतात. त्याचबरोबर 30 ते 40 रुग्ण बरे होऊन घरीही जात आहेत. गोव्यात आतापर्यंत आठ ठिकाणी सरकारने कंटेनमेन्ट झोन केले आहेत. गोव्यात पर्यटन व्यवसाय अजून सुरू झालेला नाही पण पावसाळा सुरु होताच रुग्ण वाढले. राज्याच्या सीमा सिल करा अशी मागणी विरोधी काॉग्रेस पक्षाने केली तरी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ही मागणी फेटाळून लावली आहे. प्रत्येकाने तोंडाला मास्क लावले व सोशल डिस्टनसींग पाळले तर कोविडला पूर्ण नियंत्रणात आणता येईल, असे मुख्यमंत्री सावंत यांचे म्हणणे आहे.