CoronaVirus : "पोर्तुगीज नागरिकत्व पत्करलेल्या गोमंतकीयांचे भवितव्य धोक्यात; त्यांना वाली कोण?"

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 06:57 PM2020-04-24T18:57:32+5:302020-04-24T18:57:57+5:30

मडगाव: पोर्तुगीज पासपोर्ट केल्यास युरोपाची दारे खुली होतात म्हणून हजारो गोवेकरांनी आपल्या भारतीय नागरिकत्वाचा त्याग करून पोर्तुगीज नागरिकत्व पत्करले ...

CoronaVirus : The future of Gomantakis with Portuguese citizenship is in jeopardy | CoronaVirus : "पोर्तुगीज नागरिकत्व पत्करलेल्या गोमंतकीयांचे भवितव्य धोक्यात; त्यांना वाली कोण?"

CoronaVirus : "पोर्तुगीज नागरिकत्व पत्करलेल्या गोमंतकीयांचे भवितव्य धोक्यात; त्यांना वाली कोण?"

Next

मडगाव: पोर्तुगीज पासपोर्ट केल्यास युरोपाची दारे खुली होतात म्हणून हजारो गोवेकरांनी आपल्या भारतीय नागरिकत्वाचा त्याग करून पोर्तुगीज नागरिकत्व पत्करले होते, मात्र आता तेच काहींसाठी अडचणीचे ठरलेले आहे. या पोर्तुगीज नागरिकांचा प्रश्न भारत सरकार हाताळणार की पोर्तुगीज सरकार हा कळीचा मुद्दा उपस्थित झाला आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राज्याचे एनआरआय आयुक्त नरेंद्र सावईकर याना अशा नागरिकांचे काय असे विचारले असता, आम्ही अजून विचार केलेला नाही असे त्यांनी सांगितले. सध्या मारेला या जहाजावरून जे गोवेकर खलाशी उतरले आहेत, त्यामध्येही काही पोर्तुगीज पासपोर्टधारक असल्याने त्यांना गोव्यात प्रवेश मिळेल की नाही हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

अनधिकृत माहितीप्रमाणे, विदेशात अजूनही जे 8000 च्या आसपास खलाशी अडकले आहेत, त्यापैकी किमान 700 ते 800 खलाशी पोर्तुगीज नागरिकत्व पत्करलेले आहेत. याशिवाय विदेशात काम करण्यासाठी 20000 च्या आसपास गोवेकर गेले आहेत, त्यापैकी 5000 तरी पोर्तुगीज नागरिकत्व असलेले आहेत. याही नागरिकांनी आपल्याला गोव्यात आणावे, अशी आर्जवे सुरू केली आहेत. या नागरिकांना मूळ भारतीय म्हणून भारतात प्रवेश मिळेल की पोर्तुगीज म्हणून पोर्तुगालकडे जा, असे म्हणतील हा बिकट प्रश्न उद्भवला आहे.

अशा गोवेकरांची निश्चित आकडेवारी किती हे विचारण्यासाठी एनआरआय आयुक्त सावईकर याना विचारले असता, आमच्याकडे ती उपलब्द नाही असे त्यांनी सांगितले. मागच्या ऑक्टोबर महिन्यात या कार्यालयाने  विदेशात राहणाऱ्या गोवेकरांची आकडेवारी एकत्र करण्याची प्रक्रिया सुरू केली होती मात्र कोरोनाचा त्यानंतर फैलाव सुरू झाल्याने ही प्रक्रिया बंद झाली.

Web Title: CoronaVirus : The future of Gomantakis with Portuguese citizenship is in jeopardy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.