coronavirus : गोव्यात संपूर्ण लाॅक डाऊन जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 01:02 PM2020-03-24T13:02:09+5:302020-03-24T17:03:02+5:30
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंगळवारी सकाळी मंत्रिमंडळाची बैठक घेतली व गोव्यात सर्व व्यवहार व सर्व सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.
पणजी : गोव्यात आज मंगळवारी मध्यरात्रीपासून पूर्णपणे लाॅक डाऊन सरकारने जाहीर केले. जे काही सामान खरेदी करून घरी ठेवायचे ते आजच ठेवता येईल. मध्यरात्रीपासून येत्या दि. 31 मार्चपर्यंत गोव्यात सर्व काही बंद असेल.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंगळवारी सकाळी मंत्रिमंडळाची बैठक घेतली व गोव्यात सर्व व्यवहार व सर्व सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. फक्त अत्यावश्यक अशाच मोजक्या सेवा सुरू राहतील.
गोव्यात कोरोनाचा एकही पाॅझिटीव्ह रूग्ण अजून सापडलेला नसला तरी लोक शिस्त पाळत नसल्याने पूर्ण लाइक डाऊन जाहीर करणे सरकारला गरजेचे ठरले. गोव्यात काही संशयीत रुग्णांवर उपचार सुरू आहेत. परराज्यांतील कुणीच आता गोव्यात येऊ शकत नाहीत कारण राज्याच्या सीमा सील केल्या गेल्या आहेत.