Coronavirus : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोव्यात संचारबंदी लागू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 12:07 PM2020-03-21T12:07:43+5:302020-03-21T12:11:27+5:30
Coronavirus : समाज माध्यमांवर नियंत्रण आणण्यासाठीही यंत्रणा कार्यान्वित झाली आहे.
मडगाव - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोव्यात वेगवेगळ्या अफवांना पीक येऊ लागले असून लोक रस्त्यावर येऊ लागल्यामुळे गोव्यातील दोन्ही जिल्ह्यांत 144 कलमखाली संचारबंदी लागू केली असून चारपेक्षा अधिक माणसे एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. या शिवाय प्रसारमाध्यमावरही या कलमाखाली नियंत्रण आणले गेले आहे. समाज माध्यमांवर नियंत्रण आणण्यासाठीही यंत्रणा कार्यान्वित झाली आहे.
दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी अजित रॉय यांनी लोकमतशी बोलताना शनिवारी पहाटेपासून हे कलम लागू करण्यात आल्याचे सांगितले. या आदेशामुळे आता निषेध करण्यासाठी रस्त्यावर एकत्र येण्यास बंदी आली आहे. कुठलीही सभा घेण्यासही मिळणार नाही. मात्र कार्यालयीन कामकाज, रेस्टॉरंट्स, दुकाने यांना या बंदीतून वगळण्यात आले आहे.
Coronavirus : कदंबच्या आंतरराज्य बसगाड्या ३१ मार्चपर्यंत रद्दhttps://t.co/AUpq8Y1m5l#coronavirusinindia#Goa
— Lokmat (@MiLOKMAT) March 21, 2020
इराणहून कोरोनाबाधित रुग्णांना घेऊन एक विमान गोव्यात येणार असून या रुग्णांना वास्कोतील एका रुग्णालयात बंदिस्त करून ठेवणार अशा आशयाचे वृत्त गोव्यातील एका इंग्लिश वर्तमानपत्रात छापून आल्यानंतर वास्कोत लोकामध्ये घबराटीचे वातावरण पसरून लोक रस्त्यावर आले होते. त्यानंतर या रुग्णांना मडगावात हलविण्यात आल्याची अफवा पुन्हा पसरल्यावर मडगावातील लोकही रस्त्यावर आले होते त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडली होती. या दोन घटना नंतर शांनिवारपासून दोन्ही जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. रॉय म्हणाले, सामाजिक अंतर पाळणे कोरोना रोखण्यासाठी चांगला उपाय असल्याने जास्त लोक एकत्र येऊ नये यासाठीच हे निर्बंध लागू केले आहेत, हे निर्बंध लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीतून घालण्यात आल्याने लोकांच्या सहकार्याची आम्हाला अपेक्षा आहे.
Coronavirus: ...तर कोरोना विषाणू जास्त काळ टिकणार नाही https://t.co/YVYfQlRNeS
— Lokmat (@MiLOKMAT) March 21, 2020
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus: ...तर कोरोना विषाणू जास्त काळ टिकणार नाही; राजेश टोपेंची मोलाची सूचना
Coronavirus : कोरोना व्हायरसमुळे Apple ने घेतला 'हा' मोठा निर्णय
Coronavirus : 5G टेक्नॉलॉजी कोरोना व्हायरस नष्ट करणार,चीनचा दावा
Coronavirus : जगभरात कोरोना अलर्ट! जाणून घ्या, कोणत्या देशात किती कोरोनाग्रस्त?
‘...मग कोरोना व्हायरस गिळून ढेकर दिली असती की ईडीमागे लावून बोलती बंद केली असती?’