Coronavirus in Goa: गोव्यात कोविडचा नववा बळी, 50 वर्षीय इसमाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2020 01:21 PM2020-07-09T13:21:42+5:302020-07-09T13:21:51+5:30
राज्यात एकूण कोविडग्रस्तांची संख्या दोन हजारहून जास्त झाली आहे व एकूण नऊ बळी गेल्याने गोमंतकीयांत भीती व्यक्त होत आहे.
पणजी : गोव्यात गुरुवारी एका पन्नास वर्षीय इसमाचा मृत्यू झाला. तो कोविड पॉङिाटीव होता. यामुळे कोविडमुळे नवव्या मृत्यूची नोंद झाली आहे. यापूर्वी आठजणांचे मृत्यू झाले होते.
पन्नास वर्षीय इसमाला दोन-तीन दिवस ताप येत होता. तो बुधवारी रात्री डॉक्टरांकडे गेला. डॉक्टरांनी त्याला तपासले व बांबोळीच्या गोमेकॉ इस्पितळात पाठवले. त्याची कोविड चाचणी पॉङिाटीव आली होती. त्याचा गोमेकॉ इस्पितळात मृत्यू झाला. वास्कोतील हा कोविडमुळे झालेला तिसरा मृत्यू ठरला आहे. गोमेकॉत मरण पावलेला इसम कोविडग्रस्त होता या माहितीला आरोग्य मंत्री विश्वजित राणो यांनी दुजोरा दिला.
राज्यात एकूण कोविडग्रस्तांची संख्या दोन हजारहून जास्त झाली आहे व एकूण नऊ बळी गेल्याने गोमंतकीयांत भीती व्यक्त होत आहे. कोविडचा फैलाव राज्यातील चाळीहून जास्त गावांमध्ये झाला आहे. उत्तर गोव्यापेक्षा दक्षिण गोव्यात कोविडचे जास्त रुग्ण आहेत. सरकारी यंत्रणा कोविडचा फैलाव रोखण्यात अपयशी ठरली लागली आहे.
दक्षिण गोव्यातील मुरगाव तालुक्यात सर्वाधिक म्हणजे अडिचशेहून अधिक कोविड रुग्ण आहेत. जुवारीनगर झोपडपट्टी, मांगोरहील, वास्को शहर हे भाग मुरगाव तालुक्यात येतात. कोविडग्रस्तांची संख्या वास्कोत वाढत चालली व बायणा, सडा, न्यूववाडे, मांगोरहील येथे खूप मोठय़ा संख्येने कोविडग्रस्त आढळले आहेत. बार्देश तालुक्यातील कोलवाळ तुरुंगाच्या ठिकाणी जो रक्षक कोविडग्रस्त आढळला, तोही वास्कोतीलच आहे.
वास्कोत यापूर्वी माजी मंत्री जुङो फिलिप डिसोझा यांच्या भावाचा कोविडमुळे मृत्यू झाला. 71 वर्षीय पाश्कोल डिसोझा हा नगरसेवक होता. मांगोरहीलमध्ये गेले 37 दिवस कंटेनमेन्ट झोन आहे. लोक आपल्या घरातच आहेत, सरकारी यंत्रणोकडून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जातो. गोवा राज्य दोन महिन्यापूर्वी ग्रीन झोनमध्ये होते पण आता स्थिती भयावह आहे.