coronavirus: गोव्यात कोविडमुळे 24 तासांत तिघांचा मृत्य, एकूण संख्या 32
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 01:17 PM2020-07-25T13:17:35+5:302020-07-25T13:17:42+5:30
गोव्यात कोविडमुळे रुग्णांचे मृत्यू होण्याचे सत्र सुरूच आहे. गेल्या चोवीस तासांत तिघांचा बळी गेला. यात दोघा महिलांचा व एका पुरुष रुग्णाचा समावेश आहे.
पणजी - गोव्यात कोविडमुळे रुग्णांचे मृत्यू होण्याचे सत्र सुरूच आहे. गेल्या चोवीस तासांत तिघांचा बळी गेला. यात दोघा महिलांचा व एका पुरुष रुग्णाचा समावेश आहे.यामुळे कोविडमुळे मृत्यू पावणा:या व्यक्तींची एकूण संख्या 32 झाली आहे.
पणजी शहरापासून जवळ असलेल्या चोडण येथील 80 वर्षीय महिलेला गोमेकॉ इस्पितळातून कोविड इस्पितळात दाखल करण्यात आले होते. तिला ताप येत होता. शनिवारी पहाटे तिचे निधन झाले. तिला मधूमेह, उच्च रक्तदाब व अन्य त्रस होते. दुसऱ्या 65 वर्षीय महिलेला गेल्या 11 रोजी इस्पितळात दाखल करण्यात आलेहोते. तिचाही सकाळी मृत्यू झाला. ती वास्को येथील होती. आतार्पयत कोविडमुळे जे बळी गेले आहेत, त्यातील बहुसंख्य रुग्ण हे मुरगाव तालुक्यातील आहेत. 32 पैकी पंधराहून जास्त रुग्ण मुरगाव तालुक्यातील आहेत. आज त्यात आणखी एकाची भर पडली. एका मुरगाव तालुक्यात कोविडचे सुमारे सातशे रुग्ण आतार्पयत आढळले आहेत. मांगोरहील भागात आता रुग्ण संख्या कमी होत आहे.
साखळी येथीलही एका व्यक्तीचा कोविडमुळे शनिवारी मृत्यू झाला आहे. गेल्या शनिवारी कोविडमुळे दोघांचे मृत्यू झाले होते. अलिकडे कोविडमुळे मरणा:यांची संख्या धक्कादायक पद्धतीने वाढली. साठ वर्षाहून जास्त वयाच्या अनेक रुग्णांचे बळी गेले. ज्यांना अगोदरच विविध आजार आहेत, त्यांनी कोविड काळात अधिक काळजी घेण्याची गरज आहे.
एकाच दिवशी कोविडमुळे तिघांचे बळी जाण्याची गोव्यातील ही तिसरी वेळ आहे. मडगाव येथील कोविड इस्पितळात एकूण 22क् खाटा आहेत. तिथे 5क् टक्के खाटा रुग्णांनी व्यापलेल्या आहेत. गोव्यात आतार्पयत 1 लाख 2क् हजारहून जास्त व्यक्तींच्या कोविड चाचण्या झाल्या आहेत. साडेचार हजारहून जास्त व्यक्तींना कोविडची बाधा झाली. यापैकी सुमारे तीन हजार कोविडग्रस्त आजारातून बरे झाले. अजून पाच ते सहा हजार व्यक्तींच्या चाचण्यांचे अहवाल येणो बाकी आहे.
राजधानी पणजीतही आता कोविडग्रस्तांची संख्या चाळीसहून जास्त झाली आहे. साखळीत संख्या थोडी कमी झाली. पूर्वी ती 9० हून जास्त झाली होती. वास्को रुग्णालयाच्या क्षेत्रत साडेतीनशेहून जास्त कोविडग्रस्त आहेत.
कोवॅक्सीनचा पहिला डोस
दरम्यान, कोव्ॉक्सीन ह्यूमन ट्रायल गोव्यात सुरू झाली आहे. तिसहून जास्त व्यक्ती आतार्पयत यासाठी पुढे आल्या. गोव्यातील रेडकर इस्पितळात भावेश जांबावलीकर याला या कोव्ॉक्सीनचा पहिला डोस शनिवारी देण्यात आला. जांबावलीकर हेअनेक वर्षे भाजपचे तरुण कार्यकर्ते आहेत. गोव्यात प्लाज्मा दानासाठीही वीसहून जास्त व्यक्ती पुढे आल्या आहेत.