Coronavirus : खराब हवामानामुळे नव्हे तर लॉकडाऊनमुळे गोव्याचे ट्रॉलर्स बंद, मत्स्य खवय्यांचे हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2020 02:22 PM2020-03-28T14:22:14+5:302020-03-28T14:25:00+5:30

Coronavirus : भाजीपाला आणि कडधान्य किराणामालाची दुकाने उघडी असली तरी मासळीबाजार मात्र लॉकडाऊनलोडमुळे बंद आहे.

Coronavirus goa trawlers remain closed due to coronavirus SSS | Coronavirus : खराब हवामानामुळे नव्हे तर लॉकडाऊनमुळे गोव्याचे ट्रॉलर्स बंद, मत्स्य खवय्यांचे हाल

Coronavirus : खराब हवामानामुळे नव्हे तर लॉकडाऊनमुळे गोव्याचे ट्रॉलर्स बंद, मत्स्य खवय्यांचे हाल

Next

पणजी - खराब हवामानामुळे नव्हे तर लॉकडाऊनमुळे ट्रॉलर्स मासेमारीसाठी जाण्याचे बंद झाले आह. गोव्यातील प्रमुख मालिम मासेमारी जेटीवर शेकडो ट्रॉलर्स नांगरून ठेवण्यात आले आहेत. भाजीपाला आणि कडधान्य किराणामालाची दुकाने उघडी असली तरी मासळीबाजार मात्र लॉकडाऊनलोडमुळे बंद आहे.

काही ठिकाणी गेल्या दोन दिवसात फिरत्या वाहनांमधून मासेविक्री करण्यात आली. परंतु ही वाहनेही आता बंद झाली आहेत. पर्वरी भागात शुक्रवारी एक-दोन किरकोळ मासेविक्री वाहने आली होती. परंतु काही तासातच मासळी संपल्यावर ती परतली. आज शनिवारी ही वाहने फिरकलीच नाहीत. त्यामुळे मत्स्य खवय्यांचे हाल झाले आहेत. गोव्यातील प्रमुख अन्न म्हणजे भात आणि मासळीची आमटी, परंतु मासेच मिळत नसल्याने जेवणाचा घास तोंडात जात नाही, अशी गोवेकरांची स्थिती झालेली आहे.

हंगाम संपण्याआधी व्यवसाय बंद

 मच्छिमारीचा हंगाम संपण्याआधीच ट्रॉलर्स किनाऱ्यावर आणून नांगरावे लागले आहेत. 

राज्यातील सर्वात मोठी मच्छिमारी जेटी असलेल्या मालिम जेटीवर गेल्या दोन-तीन दिवसात सुमारे २५० ट्रॉलर्स नांगरून ठेवले आहेत. एकही ट्रॉलर मासेमारीसाठी गेलेेला नाही. 

मांडवी फिशरमेन्स को ऑपरेटिव्ह सोसायटीचे माजी अध्यक्ष तथा ट्रॉलरमालक सीताकांत परब म्हणाले की,  मासे विकण्यासाठी बाजारपेठा बंद केलेला आहेत. शिवाय ट्रक बंद आहेत त्यामुळे निर्यातही होत नाही. जे अवघे काहीट्रॉलर्स समुद्रात मासेमारीसाठी गेले होते, तेही परतले आहेत. गोव्यात मे महिनाअखेरपर्यंतच मासेमारी करायला मिळते. १ जूनपासून पावसाळ्यात दोन महिने मासेमारीवर बंदी असते. मात्र लॉकडाऊनमुळे ही बंदी आतापासूनच लागू झालेली आहे. ट्रॉलर नांगरुन ठेवण्याव्यतिरिक्त पर्याय राहिलेला नसल्याचे मालिम येथील अन्य एका ट्रॉलरमालकाने सांगितले. 

शेजारी राज्यातील खलाशी अडकले

शेजारी कर्नाटक, महाराष्ट्राबरोबरच छत्तीसगढ, ओडिशा येथील खलाशीही गोव्यातील ट्रॉलर्सवर मोठ्या प्रमाणात काम करतात. पावसाळ्यात मच्छिमारी बंद असल्याने ते गांवी जातात. तेथे शेतीची कामे करतात. ही कामे आटोपल्यानंतरच ते गोव्यात परततात. गोव्यात ट्रॉलरवर काम करण्यासाठी खलाशी मिळत नसल्याने या कामगारांवरच ट्रॉलरमालकांना सर्वस्वी अवलंबून रहावे लागते. मोठ्या ट्रॉलरवर साधारणपणे ४0 तर छोट्या ट्रॉलरवर १५ ते २0 खलाशी लागतात. हे खलाशीही  ट्रॉलर्सवर अडकले असून  गावी जाण्यासाठी कोणतीही सोय नसल्याने ट्रॉलरमालकांना त्यांना  बसूनच पगार द्यावा लागत आहे, अशी माहिती या ट्रॉलरमालकाने दिली. 

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : कोरोनाचा हाहाकार! जगभरात तब्बल 5,97,458 लोकांना संसर्ग, 27,370 जणांचा मृत्यू

Coronavirus : कोरोना अलर्ट! ‘या’ धोकादायक वेबसाईटवर चुकूनही करू नका क्लिक

Coronavirus : धक्कादायक! ‘कोरोना पसरवूया’, इंजिनिअरच्या ‘त्या’ फेसबुक पोस्टने खळबळ

Coronavirus : काम नसल्याने गावी परतणाऱ्या मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू

CoronaVirus : भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ८७९ वर पोहोचली, आतापर्यंत २० जणांचा मृत्यू

 

Web Title: Coronavirus goa trawlers remain closed due to coronavirus SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.