CoronaVirus News: गोव्यात 24 तासांत सर्वाधिक 280 कोविड रुग्ण आढळले; तिघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2020 09:22 PM2020-08-01T21:22:28+5:302020-08-01T21:22:54+5:30
राज्यात आतापर्यंत 6 हजार 193 व्यक्तींना कोविडची बाधा; 4 हजार 438 जणांची कोविडवर मात
पणजी : राज्यात शनिवारी एकूण 280 नवे कोविडग्रस्त आढळले. यापूर्वी कधीच चोवीस तासांत एवढय़ा मोठय़ा संख्येने कोविड रुग्ण आढळले नव्हते. 227 कोविडग्रस्त आजारातून बरे झाले आहेत. शनिवारी एकूण तीन कोविडग्रस्तांचा मृत्यू झाला. कोविडने बळी गेलेल्या रुग्णांची एकूण संख्या 48 झाली आहे.
राज्यात आतापर्यंत 6 हजार 193 व्यक्तींना कोविडची बाधा झाली. त्यापैकी 4 हजार 438 व्यक्ती आजारातून बऱ्या झाल्या. बेती येथील 77 वर्षीय पुरुष रुग्णावर मडगावच्या कोविड इस्पितळात उपचार सुरू होते. त्याचा शनिवारी बळी गेला. वेळसाव येथील एक 71 वर्षीय महिलेचाही कोविडने मृत्यू झाला. आके- मडगाव येथील 64 वर्षीय इसमाचेही कोविड इस्पितळात शनिवारी निधन झाले. कोविडमुळे मुरगाव तालुक्यानंतर सर्वाधिक बळी सासष्टीतील रुग्णांचे गेले आहेत. त्यानंतर बार्देश तालुक्याचा क्रमांक लागतो.
पणजीत 80 कोविडग्रस्त
पणजी, पर्वरी, फोंडा अशा काही रुग्णालयांच्या तथा आरोग्य केंद्रांच्या क्षेत्रत कोविडग्रस्तांची संख्या वाढली आहे. पणजीच्या क्षेत्रत एकूण संख्या 80 झाली आहे. पर्वरीच्या क्षेत्रत संख्या 34 झाली आहे. कांदोळी आरोग्य केंद्राच्या क्षेत्रत 36 तर हळदोणा आरोग्य केंद्राच्या क्षेत्रत संख्या 18 झाली आहे. म्हापसा रुग्णालयाच्या क्षेत्रत संख्या 59 आहे. वास्को इस्पितळाच्या क्षेत्रत कोविडग्रस्तांची संख्या 30 आहे. साखळीच्या क्षेत्रत संख्या बत्तीसर्पयत खाली आली आहे. वास्को इस्पितळाच्या क्षेत्रत संख्या 39क् झाली आहे तर कुठ्ठाळी आरोग्य केंद्राच्या क्षेत्रत संख्या 334 आहे. मडकईच्या क्षेत्रत संख्या 19 आहे. लोटली आरोग्य केंद्राच्या क्षेत्रत संख्या 43 झाली आहे. कुडचडे रुग्णालयाच्या क्षेत्रत कोविडग्रस्तांची संख्या 19 आहे.
नवे बाधित- 280
सक्रिय रुग्ण- 1707
एकूण बाधित- 6193
कोरोनामुक्त- 227
एकूण कोरोनामुक्त- 4438
एकूण मृत्यू- 48