CoronaVirus News : गोव्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 40 हजारांवर, 525 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2020 01:17 PM2020-10-16T13:17:09+5:302020-10-16T13:22:58+5:30
Goa CoronaVirus News : राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या कमी होत आहे. सक्रिय रुग्णांची संख्याही कमी झाली आहे.
पणजी - राज्यात आतापर्यंत चाळीस हजार गोमंतकीयांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 35 हजार रूग्ण कोरोनामधून सावरले असून बहुतेकजण पूर्ण ठीक झाले आहेत. राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या कमी होत आहे. सक्रिय रुग्णांची संख्याही कमी झाली आहे. पूर्वी पाच हजार सक्रिय रुग्ण होते. आता चार हजार आहेत. आता कोविड चाचण्या कमी होतात. तरीही रोज दीड हजार चाचण्या पार पडतात. पावणे तीन हजार चाचण्या पूर्वी केल्या जायच्या. आतापर्यंत एकूण 2 लाख 78 हजार चाचण्या झाल्या आहेत.
20 हजार कोरोनाग्रस्तांनी होम आयसोलेश स्वीकारले आहे. तर 525 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. 8 ऑक्टोबरपर्यंत राज्यात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 4 हजार 716 होती. त्याआधी 5 रोजी सक्रिय रुग्ण संख्येने 4803 होते. 1 ऑक्टोबर रोजी सक्रिय रुग्ण 4 हजार 977 होते. 30 सप्टेंबरला सक्रिय रुग्ण 4 हजार 865 होते. ही संख्या खाली आली व 15 ऑक्टोबर रोजी सक्रिय रुग्णांची संख्या 4084 झाली. दर चोवीस तासांत सुमारे चारशे कोरोनाग्रस्त आजारातून बरे होत आहेत.
सोळा लाख लोकसंख्येच्या गोव्यात 40 हजार लोकांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत हे प्रमाण कमीच आहे. साखळीत 199, डिचोलीत 102, पेडणोत 107, म्हापसा येथे 235, पणजी 214, चिंबलला 263, शिवोलीत 129, पर्वरीत 291 व मयेत सध्या 28 कोविडग्रस्त आहेत. फोंडा भागात 24क्, कुठ्ठाळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या क्षेत्रत 182, मडगावला 287, काणकोणला 110 तर कुडचडे आरोग्य केंद्राच्या क्षेत्रत 120 कोरोनाग्रस्त आहेत. सांगेत 49, केपेत 77, चिंचिणी 20 तर वास्कोत 222 कोरोनाग्रस्त आहेत.