CoronaVirus News : ठराविक कोरोनाग्रस्तांना घरी राहण्याची मुभा - प्रमोद सावंत 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2020 03:11 PM2020-07-22T15:11:42+5:302020-07-22T15:14:18+5:30

कोरोनाग्रस्तांची जर इच्छा असेल तर लक्षणे नसलेले कोरोनाग्रस्त घरीच राहू शकतात. मात्र त्यासाठी उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडे त्यांनी अर्ज करून परवानगी घ्यावी लागेल.

CoronaVirus News: Certain Corona victims are allowed to stay at home - Pramod Sawant | CoronaVirus News : ठराविक कोरोनाग्रस्तांना घरी राहण्याची मुभा - प्रमोद सावंत 

CoronaVirus News : ठराविक कोरोनाग्रस्तांना घरी राहण्याची मुभा - प्रमोद सावंत 

Next

पणजी : कोरोनाची कोणतीही लक्षणे दाखवत नाहीत, अशा कोरोनाग्रस्तांना स्वतःच्या घरी क्वारंटाईन  राहण्याची मुभा सरकार देणार आहे. पूर्ण देशात अशा पद्धतीची नवी प्रक्रिया सध्या स्वीकारली जात आहे व गोव्यातही तीच प्रक्रिया रुग्णांच्या इच्छेनुसार लागू केली जाईल. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 

कोरोनाग्रस्तांची जर इच्छा असेल तर लक्षणे नसलेले कोरोनाग्रस्त घरीच राहू शकतात. मात्र त्यासाठी उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडे त्यांनी अर्ज करून परवानगी घ्यावी लागेल. अर्जदाराच्या घरी स्वतंत्र बेडरूम, स्वतंत्र शौचालय व अन्य सुविधा आहेत की नाही हे उपजिल्हाधिकारी पाहतील व मान्यता देतील असे मुख्यमंत्री म्हणाले. जर एखाद्या कुटुंबातील सगळे म्हणजे चार किंवा पाचही भाऊ कोरोनाग्रस्त आढळले व त्यांच्याकडून काही लक्षणे दाखवली जात नसतील तर त्यांनी घरीच निगराणीखाली राहणे योग्य ठरेल. शेवटी रुग्णाच्या इच्छेनुसार सरकार परवानगी देईल. अशावेळी शेजारी लोकांनीही कोरोनाग्रस्तांना सहकार्य करायला हवे, त्यांना वेगळ्या नजरेने पाहू नये असे मुख्यमंत्री म्हणाले. 

गोव्यात बाहेरून जे प्रवासी येतात, त्यांची अॅन्टीजंट चाचणी केली जाईल. उद्या गुरूवार पासून ही प्रक्रिया सुरु होईल. तसेच, मांगोरहीलच्या भागात आजपासून अॅन्टिबॉडी चाचणी केली जाईल. आमदार कार्लुस आल्मेदा यांनी तशी मागणी केली होती. अॅन्टीबॉडीज तयार झाल्या आहेत की नाही हे छोटा मांगोरहीलमध्ये अगोदर कळून येईल. हे लोक मग प्लाझ्मा देण्यासाठीही तयार होतील अशी ग्वाही आमदार आल्मेदा यांनी दिली असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.

क्लाफास आयसीयूतून बाहेर 
दरम्यान कुंकळ्ळीचे आमदार क्लाफास डायस हे कोविडमधून सावरले आहेत. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार केले गेले. तिथे ते ठिक झाले व त्यामुळे आता त्यांना आयसीयूमध्ये ठेवले गेले आहे. थकवा आलेला असल्याने त्यांना काळजी घ्यावी लागते. कृत्रिम  ऑक्सिजन वापरावा लागतो, असे मुख्यमंत्री म्हणाले. गोव्यात आतापर्यंत ज्या कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. त्यातील बहुतेकजण हृदयरोगी होते किंवा डायबेटीस, मूत्रपिंड विकार असे अनेक आजार त्यांना होते. अशा व्यक्तींना कोरोना होऊ नये म्हणून अधिक काळजी घ्यावीच लागेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

आणखी बातम्या...

मृत्यूनंतरही आठ लोकांसाठी ठरला फरिश्ता; २७ वर्षीय तरुणाचे अवयवदान

नालासोपाऱ्यात रेल्वे स्थानकावर प्रवाशांचा उद्रेक, ट्रॅकवर उतरून गोंधळ

चीनविरोधात जागतिक आघाडी, अमेरिकेने घेतली अशी भूमिका    

"मी म्हणजे ट्रम्प नाही..." उद्धव ठाकरेंच्या अनलॉक मुलाखतीचा प्रोमो रिलीज    

"बंदीचे कठोर पालन करा, अन्यथा....", मोदी सरकारचा चिनी अ‍ॅप्स कंपन्यांना इशारा

Oxford नंतर चीनची लस होतेय यशस्वी, कोरोनाशी लढण्याची वाढवते ताकद...

सरकारी कर्मचार्‍यांसाठी खूशखबर! नाईट शिफ्ट केली तर आता असा होणार फायदा...   

Web Title: CoronaVirus News: Certain Corona victims are allowed to stay at home - Pramod Sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.