CoronaVirus News in Goa : सासष्टीत 8 गावांमध्ये कोरोनाचा फैलाव, नागरिकांमध्ये भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 08:34 PM2020-06-23T20:34:34+5:302020-06-23T20:37:13+5:30
CoronaVirus News in Goa: मडगाव, कुडतरी, आंबेली या तीन गावासह राय, लोटली, नावेली, नुवे व केळशी या भागात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.
मडगाव: सासष्टीत कोरोना फैलाव फक्त मडगाव, कुडतरी आणि आंबेली या गावापुरताच राहिलेला नसून एकूण 8 गावात पसरल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे . मंगळवारी कुडतरी येथे तीन नवीन रुग्ण आढळल्याने रुग्णांची संख्या 28 वर तर लोटली येथे 2 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 6 झाली आहे. या पार्श्वभूमीवर या तालुक्यातील कोविड निगा केंद्रात वाढ करण्यात आली आहे.
मडगाव, कुडतरी, आंबेली या तीन गावासह राय, लोटली, नावेली, नुवे व केळशी या भागात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. कुडतरी येथील रुग्णाची संख्या सर्वात जास्त म्हणजे 25 आहे. मडगावात 16, आंबेलीत 15, राय येथे 7, लोटली येथे 4 केळशी येथे 2 तर नावेली आणि नुवे येथे प्रत्येकी एक रुग्ण सोमवार पर्यंत आढळले होते.
या पार्श्वभूमीवर तालुक्यातील रुग्णांची संख्या वाढण्याची संख्या लक्षात ठेवून कालकोंडा येथील दैवज्ञ भवन कोविड निगा केंद्र म्हणून जाहीर केले असून या केंद्रात 150 ते 200 खाटांची सोय करण्यात येणार असून या केंद्रात लक्षणे दिसून न येणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांना ठेवण्यात येणार आहे. मडगाव रेसिडेन्सीही कोविड निगा केंद्र म्हणून जाहीर करण्यात आले असून जर वैद्यकीय सेवा देणारे पॉझिटिव्ह आढळले तर त्यांच्यावर या केंद्रात उपचार करण्यात येणार आहेत. या शिवाय नावेली स्टेडियम, फातोरडा इनडोअर स्टेडियम आणि कोलवा रेसिडेन्सी अशी तीन केंद्रे यापूर्वीच निगा केंद्रे म्हणून जाहीर करण्यात आली आहेत.
वेळली मतदारसंघातील आंबेली या गावात मोठ्या संख्येने रुग्ण आढळल्याने या मतदारसंघातील 5 पंचयती स्वतःहून पुढे आल्या असून त्यांनी या रुग्णांना ठेवण्यासाठी स्वतःहून कोविड निगा केंद्रासाठी जागा सुचविल्या आहेत. आंबेली भागांसाठी पंचायत घर तसेच एसपी हॉल, असोळणा येथे रेजिना हॉल, तर वेळलीसाठी रिव्हर साल, सी गर्ल, मे फेअर या तीन हॉटेल्ससह टल्याकट्टा स्टेडियम आणि बाराडी सामाजगृह अशा जागा सरकारला सुचविण्यात येणार असल्याची माहिती वेळलीचे सरपंच सावियो डिसिल्वा यांनी दिली.
व्यावसायिक प्रकल्पात क्वारंटाईन केंद्र
मडगावच्या मध्यभागी असलेल्या रिलायन्स ट्रेड सेन्टर या गजबजलेल्या व्यावसायिक प्रकल्पात असलेले तनिष हॉटेल क्वारंटाईन केंद्र केले आहे. त्यामुळे या प्रकल्पातील इतर आस्थापणांनी भीती व्यक्त केली आहे. याच प्रकल्पात एलआयसीचे कार्यालय असून त्यात दर दिवशी शेकडो लोक येत असतात. या हॉटेलमध्ये निगराणीखाली ठेवलेले काहीजण पॉझिटिव्ह आढळून आल्याने त्यांना कोविड निगा केंद्रात हलविण्यात आले. या प्रकल्पात एकच लिफ्ट असून ती लोक वापरतात त्याच लिफ्टचा वापर रुग्णाणाही नेण्यासाठी केला जात असल्याने इतरांनी भीती व्यक्त केली आहे. अशाने इतराना कोरोना होऊ शकतो असा दावा केला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार केल्यास आपली जबाबदारी दुसऱ्यावर ढकलण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.
आणखी बातम्या...
वाहतूक कोंडीमुळे ‘वर्क फ्रॉम कार’, प्रवीण दरेकरांची सरकारवर टीका
दुबईत भारतीय जोडप्याची हत्या, पाकिस्तानच्या नागरिकाला अटक
हिंदुत्वामुळे राज ठाकरेंबद्दलचा इंटरेस्ट वाढला; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली 'राज की बात'
"राज ठाकरेंसोबत 'या' दोन गोष्टीत आमचं पटू शकतं, पण..."
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी रिक्षावाल्याचा 'देसी जुगाड', व्हिडीओ पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य!