CoronaVirus News : प्लाझ्मा दान करण्यासाठी अनेकजण पुढे येतील - आरोग्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2020 03:07 PM2020-07-24T15:07:58+5:302020-07-24T15:25:25+5:30
"आम्ही आणखी जागृती करू. प्लाझ्मा दानविषयीचे गैरसमजही दूर केले जातील. गोव्यात लोक सुशिक्षित आहेत. त्यामुळेच प्लाझ्मा थेरपीचा आमचा प्रयोग यशस्वी होईल."
पणजी : गोव्यात जे लोक कोविडच्या आजारातून बरे झाले आहेत, त्यापैकी अनेकजण प्लाज्मा दान करण्यासाठी पुढे येतील, असा विश्वास आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीवेळी व्यक्त केला.
प्लाझ्मा थेरपी प्रक्रियेच्या प्रस्तावाचा मी कायम पाठपुरावा केला. तो प्रस्ताव मंजूर झाला आहे. प्लाझ्मा देण्यासाठी लोकांनी पुढे यावे, असे आवाहन आपण अगोदरही केले होते व आताही करतो. सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन लोक प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे येत आहेत. पहिल्यांदा म्हणजे गेल्या आठवडय़ात अकरा जण पुढे आले. त्यात गेल्या दोन दिवसांत आणखी भर पडली व एकूण संध्या सोळा झाली आहे, असे मंत्री राणे यांनी सांगितले. ज्या व्यक्ती कोरोनाच्या आजारातून बऱ्या झाल्या, त्यांच्यात प्लाझ्मा दानाविषयी जागृती होत आहे, असे, विश्वजित राणे यांनी सांगितले.
आम्ही आणखी जागृती करू. प्लाझ्मा दानविषयीचे गैरसमजही दूर केले जातील. गोव्यात लोक सुशिक्षित आहेत. त्यामुळेच प्लाझ्मा थेरपीचा आमचा प्रयोग यशस्वी होईल. अत्यंत गंभीर अशा रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी करून त्यांचे जीव वाचविले जातील. प्लाझ्मा थिरपीची सुरूवात अजून झालेली नाही. आम्ही प्लाझ्मा बँक तयार करत आहोत. प्लाझ्मा बँक यशस्वी होईल, असा मला पूर्ण विश्वास आहे, असे विश्वजित राणे म्हणाले.
याशिवाय, पुढील काही दिवसांत आणखी लोक प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे येतील. रक्तदान करण्यासाठी ज्या पद्धतीने लोक पुढे येतात, त्याच पद्धतीने केवळ प्लाझ्मा दान करण्यासही अनेकजण पुढे येतील. गोव्यात कोविड चाचण्यांची संख्या आम्ही वाढवत नेली. काही महिन्यांपूर्वी चाचण्यांची संख्या कमी होती पण आता ती खूपच वाढली आहे. तसेच कोविडच्या आजारातून बरे होणा-यांची संख्याही वाढली आहे. सरकारची उपाययोजना यशस्वी ठरत आहे, प्लाझ्मा बँकबाबतही गोव्याला यश मिळेल, असे मंत्री राणे म्हणाले.
आणखी बातम्या...
CoronaVirus News : कोरोनावरील इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या महिलेला अटक
इराणच्या पॅसेंजर विमानाजवळ आली दोन अमेरिकन लढाऊ विमाने, थोडक्यात मोठा अपघात टळला
"छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला असता तर तिथेच राजीनामा दिला असता"
बापरे! पत्नीचे 14 जणांसोबत शारीरिक संबंध; पतीने पाठवली सर्वांना कायदेशीर नोटीस अन्...
मृत्यूनंतरही आठ लोकांसाठी ठरला फरिश्ता; २७ वर्षीय तरुणाचे अवयवदान