CoronaVirus News : गोव्यात कोरोनामुळे तिघांचा मृत्यू, आतापर्यंत संख्या पोहोचली २६ वर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2020 03:42 PM2020-07-21T15:42:52+5:302020-07-21T16:19:07+5:30
दक्षिण गोव्यातील मुरगाव तालुक्यात सर्वाधिक म्हणजे सातशे कोरोनाग्रस्त आतापर्यंत आढळले आहेत.
पणजी : गोव्यात कोरोनामुळे मरण पावणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. मंगळवारी तिघांचा बळी गेला. यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एकूण रुग्णांची संख्या गोव्यात 26 झाली आहे. एकाच दिवशी तिघांचे कोरोनामुळे बळी गेले, अशी ही गेल्या पंधरा दिवसांतील दुसरी घटना आहे.
गोव्यात एकूण एक लाखाहून जास्त व्यक्तींच्या कोरोना चाचण्या झाल्या आहेत. सुमारे चार हजार व्यक्ती कोरोनाग्रस्त असल्याचे आतापर्यंत निष्पन्न झाले व त्यापैकी बहुतेकजण उपचारानंतर ठीक झाले व घरी गेले. पन्नास- साठ रुग्ण सध्या मडगाव येथील कोविड इस्पितळात उपचार घेत आहेत. त्याशिवाय अनेकजण कोविड काळजी केंद्रात राहिले आहेत. त्यांनी स्वत:ला विलग करून ठेवलेले आहे. गोव्यात कोरोनामुळे आतापर्यंत ज्यांचा बळी गेला, त्यात माजी आरोग्य मंत्री, एक नगरसेवक व इतरांचा समावेश आहे. गोव्याचे माजी मंत्री जुडो फिलिप डिसोझा व त्यांच्या पत्नीलाही कोरोनाची लागण झाल्याचे दोन दिवसांपूर्वी स्पष्ट झाले.
मंगळवारी अगोदर 65 वर्षीय प्यारीजन निरंगी नावाच्या इसमाचा कोरोनामुळे मडगावच्या कोविड इस्पितळात मृत्यू झाला. त्याचप्रमाणे मग सुकूबाई रामाणी ह्या 64 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयीन इस्पितळात ह्या व्यक्तीवर उपचार सुरू होते. ह्या रुग्णाला मंगळवारी खूप अस्वस्थ वाटू लागले. श्वास घेताना त्रस होऊ लागला. तापही आला होता. यामुळे कोविड इस्पितळात नेत असताना वाटेत मृत्यू झाला.
उत्तर गोव्यातील खोर्ली- म्हापसा येथील एका 52 वर्षीय व्यक्तीला खासगी इस्पितळातून सरकारच्या जिल्हा इस्पितळात आणले गेले होते. त्याला मृत आणले गेले होते. संशयावरून तेथील डॉक्टरांनी त्याची कोविड चाचणी केली, त्यावेळी तोही कोरोनाग्रस्त असल्याचे निष्पन्न झाले. यामुळे एकूण 26 मृत्यूंची नोंद मंगळवारी झाली. गोव्यात रोज सरासरी 150 नवे कोरोनाग्रस्त आढळत आहेत. दक्षिण गोव्यातील मुरगाव तालुक्यात सर्वाधिक म्हणजे सातशे कोरोनाग्रस्त आतापर्यंत आढळले आहेत.
आणखी बातम्या...
बाटलीबंद पाण्याला २० रुपये अन् दुधाला १७ रुपये दर, हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे - राजू शेट्टी
Oxford नंतर चीनची लस होतेय यशस्वी, कोरोनाशी लढण्याची वाढवते ताकद...
मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांचे निधन
दूध तापलं! स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दुधाचा टँकर फोडला...
रावणाने पहिले विमान उड्डाण केले, सिद्ध करण्याचा श्रीलंकेचा दावा
सरकारी कर्मचार्यांसाठी खूशखबर! नाईट शिफ्ट केली तर आता असा होणार फायदा...