coronavirus: ४७३ गोमंतकीय बांधवांना घेऊन मुरगाव बंदरात पोचले ‘नॉर्वेजियन एस्केप’ जहाज
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 08:35 PM2020-06-29T20:35:13+5:302020-06-29T20:35:34+5:30
सकाळी ८ वाजता मुरगाव बंदराच्या क्रुज धक्यावर ‘नॉर्वेजियन एस्केप’ नावाचे विदेशी जहाज दाखल झाले आहे. या जहाजात २५०० हून अधिक खलाशी बांधव असल्याची माहीती जेरॉम यांनी देऊन यापैंकी ४७३ गोमंतकीय असल्याचे त्यांनी सांगितले.
वास्को - सोमवारी (दि.२९) सकाळी ‘नॉर्वेजियन एस्केप’ हे विदेशी जहाज २५०० हून अधिक जहाजावर खलाशी म्हणून काम करणा-या बांधवांना घेऊन एमपीटी च्या क्रुज धक्यावर दाखल झाले. यापैंकी ४७३ खलाशी म्हणून काम करणारे बांधव गोमंतकीय असून, त्यांना येथे सोडण्यात आल्यानंतर सदर जहाज इतर बांधवांना सोडण्यासाठी दुस-या बंदरावर जाण्याकरिता निघणार आहे. या ४७३ गोमंतकीय बांधवांचे कोरोनाबाबत चाचणी करण्यासाठी नमूने घेण्याच्या कामाला सोमवारी सुरवात झाली असून चाचणींचा अहवाल येईपर्यंत त्यांना याच जहाजावर ठेवणार असल्याची माहीती एमपीटी चे वरिष्ठ वाहतूक उपव्यवस्थापक जेरॉम क्लेमेंत यांनी दिली.
११ दिवसापूर्वी मुरगाव बंदरात ‘सेलेब्रेटी इंन्फनेटी’ नावाचे विदेशी जहाज १४५० गोमंतकीय खलाशी बांधवांना घेऊन दाखल झाले होते. त्या जहाजावरील सर्व गोमंतकीयांचे कोरोनाबाबत अहवाल ‘नेगेटीव्ह’ आल्यानंतर ‘एसओपी’ नियमाचे पालन करून नंतर त्यांना जहाजावरून घरी पाठवण्यात आले होते. सोमवारी (दि.२९) सकाळी ८ वाजता मुरगाव बंदराच्या क्रुज धक्यावर ‘नॉर्वेजियन एस्केप’ नावाचे विदेशी जहाज दाखल झाले आहे. या जहाजात २५०० हून अधिक खलाशी बांधव असल्याची माहीती जेरॉम यांनी देऊन यापैंकी ४७३ गोमंतकीय असल्याचे त्यांनी सांगितले. गोमंतकीय बांधवांना गोव्यात सोडण्यासाठी हे जहात मुरगाव बंदरात आले असून, यानंतर महाराष्ट्र व इतर भागातील खलाशी बांधवांना सोडण्याकरिता सदर जहाज मुंबई बंदरावर जाण्यासाठी निघणार असून त्यानंतर सदर जहाज फिलीपींन्स राष्ट्रात जाणार असल्याची माहीती जेरॉम यांनी दिली. या जहाजातून आलेल्या ४७३ गोमंतकीयांचे कोरोना विषाणूबाबत चाचणी करण्यासाठी अहवाल घेण्याचे काम सुरू केल्यानंतर संध्याकाळी ५ पर्यंत सुमारे ३०० जणांचे नमूने घेण्यात आले होते. सोमवारी रात्री पर्यंत सर्व ४७३ बांधवांचे कोरोना विषाणूबाबत चाचणी करण्यासाठी नमूने घेण्याचे काम पूर्ण होणार असा विश्वास जेरॉम यांनी पुढे व्यक्त केला.
कोरोना विषाणूबाबत चाचणी करण्याकरिता नमूने घेण्याचे काम करण्यासाठी आरोग्य खात्याने मुरगाव बंदरात सोमवारी २० डॉक्टर, आरोग्य अधिकारी व आरोग्य कर्मचाºयांचे पथक नियुक्त केल्याची माहीती जेरॉम यांनी दिली. चाचणीसाठी नमूने घेतल्यानंतर या जहाजातून आलेल्या ४७३ गोमंतकीय बांधवांचे मंगळवारपर्यंत अहवाल येणार असल्याची अपेक्षा जेरॉम क्लेमेंन्त यांनी व्यक्त केली. अहवाल ‘नेगेटीव्ह’ आल्यानंतर ‘एसओपी’ नियमाचे पालन करून या बांधवांना त्यांच्या घरी कोरंन्टाईनसाठी पाठवण्यात येणार असल्याची माहीती जेरॉम क्लेमेंन्त यांनी पुढे दिली. जो पर्यंत सदर गोमंतकीय खलाशी बांधवांचा कोरोना विषाणूबाबत अहवाल येत नाही तो पर्यंत ते याच जहाजावर राहणार अशी माहीती जेरॉम यांनी दिली. सदर जहाज ग्रीस, इजिप्तमार्गे होत गोव्याच्या मुरगाव बंदरात दाखल झाले असल्याचे जेरॉम यांनी शेवटी सांगितले.