CoronaVirus News: गोव्यात दर ७० कोरोना चाचण्यांमागे एक पॉझिटिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 03:01 PM2020-06-23T15:01:26+5:302020-06-23T15:01:54+5:30
गोवा सरकार कोविडबाबत गंभीर नसल्याचा विरोधकांचा आरोप
पणजी : गोव्यात जूनच्या मध्यापर्यंत प्रत्येक ४०० कोविड चाचण्यांमध्ये एक पॉझिटिव्ह आढळून येत होता. आज हे प्रमाण ७० चाचण्यांमध्ये एक पॉझिटिव्ह एवढे झालेले असून प्रमाण वाढत असल्याने ही बाब चिंताजनक बनली आहे. गोवा सरकार कोविडबाबत गंभीर नाही तसेच जागृतीच्या बाबतीतही उदासिनता दिसून येत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.
आम आदमी पक्षाच्या एका युवा नेत्याच्या मते सरकारकडून दावा केला जातो त्याप्रमाणे रुग्ण सात दिवसात बरे होताना दिसत नाहीत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण केवळ १७ टक्के आहे. सरकारने याकडे गंभीरपणे लक्ष देण्याची गरज आहे. रविवारी एकाच दिवशी ६४ पॉझ्टिव्ह रुग्ण आढळून आले.
चाचण्या आणि पॉझिटिव्ह रुग्ण
तारीख पॉझिटिव्ह चाचण्या टक्के
१६ मे २० ८०११ ०.२५
२३ मे ५५ ११,९४५ ०.४६
३० मे ७० १७,८७१ ०.३९
६ जून २६७ २७,४०२ ०.९७
१३ जून ५२३ ४०,७२३ १.२८
२०जून ७५४ ५१,४०४ १.४७