Coronavirus: गोव्यात तीन चाचण्यांमध्ये एक पॉझिटिव्ह; कोविडबाधितांचे प्रमाण सरासरी ३० टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2020 10:05 PM2020-09-27T22:05:22+5:302020-09-27T22:05:31+5:30
राज्यात कोविडचा फैलाव झपाट्याने होत आहे. सुरुवातीलाच १७ मे ते २३ मे या कालावधीत ३,९३४ चाचण्यांमध्ये केवळ ३५ पॉझिटिव्ह आढळले.
पणजी : गोव्यात कोविड चांचण्यांमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण आढळण्याचे प्रमाण सध्या सरासरी ३0 टक्के असून ते लक्षणीय आहे. गेल्या तीन आठवड्यांमध्ये असे निष्पन्न झाले की, प्रत्येकी तीन कोविड चाचण्यांमध्ये एक पॉझिटिव्ह आढळून येत आहे.
आरोग्य खात्याच्या बुलेटिनमधील आकडेवारीचा आढावा घेतला असता वरील गोष्ट स्पष्ट झाली. गेल्या तीन आठवड्यांमध्ये कोविड चांचण्या करण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. ६ सप्टेंबर ते १२ सप्टेंबर या कालावधीत १२,८४४ कोविड चांचण्या करण्यात आल्या. त्यात ३,७३0 पॉझिटिव्ह आढळून आले. हे प्रमाण २९.0४ टक्के होते.
- १३ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर या कालावधीत ११,८९५ कोविड चांचण्या करण्यात आल्या. त्यात ३,८३७ पॉझिटिव्ह आढळून आले. हे प्रमाण ३२.२६ टक्के एवढे होते. २0 सप्टेंबर ते २६ सप्टेंबर या कालावधीत १२,३६६ कोविड चांचण्या करण्यात आल्या. त्यात ३,५५२ पॉझिटिव्ह आढळून आले. हे प्रमाण २८.७२ टक्के एवढे होते.
राज्यात कोविडचा फैलाव झपाट्याने होत आहे. सुरुवातीलाच १७ मे ते २३ मे या कालावधीत ३,९३४ चाचण्यांमध्ये केवळ ३५ पॉझिटिव्ह आढळले. हे प्रमाण केवळ 0.८९ टक्के एवढे होते. जून अखेरपर्यंत हे प्रमाण ३.६४ टक्क्यांवर पोचले. जुलै अखेरीस ते झपाट्याने वाढून १३.६३ टक्क्यांवर गेले. ऑगस्टअखेरीस १८.१२ टक्क्यांवर तर आता सप्टेंबरअखेरीस सरासरी ३0 टक्क्यांवर घुटमळत आहे.
तुलनेत चांचण्याही कमी
जूनपासून चांचण्यांचे प्रमाण वाढले. परंतु आता मात्र तुलनेत चांचण्याही कमी होत आहेत. ५ जुलै ते ११ जुलै या आठ दिवसात तब्बल १६,५0३चांचण्या झाल्या होत्या. ऑगस्टच्या अखेरच्या सप्ताहात १५,९६४ चांचण्या झाल्या. मात्र गेल्या सप्ताहात म्हणजेच २0 ते २६ सप्टेंबर या कालावधीत केवळ १२,३६६ कोविड चांचण्या झाल्या.
दोन महिन्यातील चांचण्या व पॉझिटिव्ह टक्केवारी
चांचण्या पॉझिटिव्ह टक्के
२ ते ८ ऑगस्ट १४,३0८ २0१३ १४.0७
९ ते १५ ऑगस्ट १६,७३६ ३१३३ १८.७२
१६ ते २२ ऑगस्ट १५,९६२ २४५१ १५.३६
२३ ते २९ ऑगस्ट १५,२४८ २७६३ १८.१२
३0 ते ५ सप्टें. १५,९६४ ३९0२ २४.४४
६ ते १३ सप्टें. १२,८४४ ३७३0 २९.0४
१३ ते. १९ सप्टें. ११,८९५ ३८३७ ३२.२६
२0 ते २६ सप्टें. १२,३६६ ३,५५२ २८.७२