Coronavirus: मुंबईत निगेटिव्ह असलेले लोक गोव्यात पोहचताच आढळले कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 11:13 AM2020-05-24T11:13:21+5:302020-05-24T11:14:08+5:30

मुंबईहून गोव्यात येण्यासाठी लागणारा कालावधी हा दुसऱ्या चाचणीचा अहवाल वेगळा दाखविण्याचे कारण ठरते.

Coronavirus: People with negative coronavirus found on arrival in Goa | Coronavirus: मुंबईत निगेटिव्ह असलेले लोक गोव्यात पोहचताच आढळले कोरोना पॉझिटिव्ह

Coronavirus: मुंबईत निगेटिव्ह असलेले लोक गोव्यात पोहचताच आढळले कोरोना पॉझिटिव्ह

googlenewsNext

पणजीः कोरोना संसर्गाच्या चाचण्याचे अहवालही अनेकवेळा चक्रावून सोडणारे असतात. मुंबईत करण्यात आलेल्या चाचणीत नेगेटीव्ह ठरलेले काही लोक ट्रेनने गोव्यात आले. गोव्यात त्यांच्या पुन्हा चाचण्या करण्यात आल्या. त्यात नेगेटीव्ह ठरलेले बरेच जण पॉझिटीव्ह म्हणजे कोरोना संसर्गीत आढळून आल्याची माहिती मडगाव कोविड इस्पितळातील सूत्रांकडून देण्यात आली. 

हे असे केवळ ट्रेनमधुन आलेल्यांच्या बाबतीतच नव्हे तर रस्ता मार्गाने आलेल्यांच्या बाबतीतही घडले आहे. रस्ता मार्गे आलेल्या  लोकांची जेव्हा चेक नाक्यावर तपासणी करण्यात आली तेव्हा त्यांनी महाराष्ट्रात करण्यात आलेल्याचाचणी अहवाल नाक्यावरील यंत्रणांना दाखविला. त्यात ते नेगेटीव्ह आढळले होते. येथील मार्गदर्शक तत्वांनुसार त्यांची पुन्हा जिल्हा इस्पितळात नेऊन चाचणी करण्यात आली त्यावेळी नेगेटीव्ह ठरलेल्यांच्यापैकीच काही जण पॉझिटीव्ह आढळून आले होते. 

दोन चाचणीत दाखवणाऱ्या फरकाची अनेक कारणे तज्ज्ञांकडून दिली जात आहेत. एक म्हणजे काही प्रवाशांना ट्रेनमध्येच संसर्ग झाल्याचे चौकशीतून आढळून आले. त्यातही ट्रेनमधील संडासचा वापर केलेल्यांना दोघांना संसर्ग झाल्याचे आढळून आले. 

दुसरे कारण म्हणजे मुंबईहून गोव्यात येण्यासाठी लागणारा कालावधी हा दुसऱ्या चाचणीचा अहवाल वेगळा दाखविण्याचे कारण ठरते. कारण संसर्गित व्यक्तीच्या शरिरात कोरोना व्हायरस हा नुकताच शिरलेला असल्यास तो चाचणीत आढळून येईल असे नाही. तेथून गोव्यात पोहोचेपर्यंत काही वेळ जात असतो आणि इन्फेक्शन काही अंशी वाढलेले असते. त्यावेळी तो पॉझीटीव्ह आढळतो. तिसरे कारण चाचणी घेण्याची पद्धत. चाचणीसाठी घेतले जाणारे लाळेचे नमुने हे व्यवस्थीतपणे घेणे आवश्यक असते. अन्यथा चाचणी अहवाल चुकीचा येण्याची शक्यता असते अशी माहिती आरोग्य यंत्रणांकडून देण्यात आली. 

Web Title: Coronavirus: People with negative coronavirus found on arrival in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.