coronavirus: गोव्यात कोविडवरून राजकीय घमासान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2020 04:31 AM2020-08-30T04:31:01+5:302020-08-30T04:32:05+5:30
सुमारे सोळा लाख लोकसंख्येच्या गोव्यात एक टक्का लोक म्हणजे सोळा हजार लोक कोविडबाधित आहेत. कोविडचा फैलाव नियंत्रणात आणण्यात, रुग्णांना वैद्यकीय सोयीसुविधा देण्यास सरकारला सर्व स्तरांवर अपयश आल्याची टीका विरोधकांसह सत्तारूढ भाजपमधील काही घटकांनीही केलेली आहे.
- सुरेश गुदले
पणजी : गोव्यात कोविड-१९ वरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी मार्चपासून झडत आहेत. ग्रीन गोवा म्हणून स्वत:ची पाठ थोपटून घेणाऱ्या गोव्यात सध्या बळींची संख्या दोनशेच्या उंबरठ्यावर आहे.
सुमारे सोळा लाख लोकसंख्येच्या गोव्यात एक टक्का लोक म्हणजे सोळा हजार लोक कोविडबाधित आहेत. कोविडचा फैलाव नियंत्रणात आणण्यात, रुग्णांना वैद्यकीय सोयीसुविधा देण्यास सरकारला सर्व स्तरांवर अपयश आल्याची टीका विरोधकांसह सत्तारूढ भाजपमधील काही घटकांनीही केलेली आहे. कोविड रुग्णांवर अन्य काही आजारांवरून शस्त्रक्रिया करण्याची वेळ आल्यास तशी कोविड बाह्य रुग्ण आणि शस्त्रक्रिया विभागही सुरू केलेला आहे. दोन सरकारी रुग्णालयाशिवाय दोन खासगी रुग्णालयांची रुग्ण सामावून घेण्याची क्षमता संपलेली आहे.