धक्कादायक! क्वारंटिन केलेल्या 'त्या' व्यक्तीला सोडण्यासाठी नेत्याचे डॉक्टरांना फोन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2020 09:59 PM2020-05-25T21:59:47+5:302020-05-25T22:01:12+5:30

क्वारंटिन केंद्रातून निघण्यासाठी डॉक्टरांना धमक्या; दबाव आणण्याचा प्रयत्न

coronavirus sailors using political pressure for leaving quarantine centre in goa kkg | धक्कादायक! क्वारंटिन केलेल्या 'त्या' व्यक्तीला सोडण्यासाठी नेत्याचे डॉक्टरांना फोन

धक्कादायक! क्वारंटिन केलेल्या 'त्या' व्यक्तीला सोडण्यासाठी नेत्याचे डॉक्टरांना फोन

Next

- वासुदेव पागी

पणजी: सरकारी क्वारन्टाईन व्यवस्थेत ठेवण्यात आलेल्या लोकात सभ्य मंडळीही असतात, परंतु त्या ठिकाणच्या डॉक्टरसह इतर वैद्यकीय मंडळीला वैताग आणला तो काही खलाशांनी. आत्ताच चाचणी अहवाल द्या, घरी जाऊ द्या, या मंत्र्याला  फोन करेन आणि त्या नेत्याला फोन करेन अशा सततच्या धमक्याही काही खलाशी देत राहतात अशी माहिती सरकारी क्वारन्टाईनची व्यवस्था पाहणाऱ्यांकडून देण्यात आली. 

विदेशात जहाजांवर काम करणारे गोमंतकीय खलाशी विदेशातच अडकून पडले होते. राज्य व केंद्र सरकारच्या प्रयत्नातून त्यांना गोव्यात आणण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. ते करताना एक प्रमाण पद्धती ठरवण्यात आली व ती सर्वांना लागू झाली. त्यानुसार त्यांना गोव्यात पोहोचल्यावर सरकारी क्वारन्टाईनमध्ये ठेवले जाते. त्या ठिकाणी त्याची कोरोनासाठी चाचणी केली जाते. चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला तर थेट कोविड इस्पितळात आणि नेगेटीव्ह आला तर ७ दिवस सरकारी क्वारन्टाईनमध्ये व नंतर  ७ दिवसांच्या होमक्वारन्टाईनमध्ये पाठविले जाते. 

क्वारन्टाईनमध्ये काम करणाऱ्या काही डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून दैनिक लोकमतनं माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी धक्कादायक गोष्टी सांगितल्या. बऱ्याच खलाशांना ७ दिवस सरकारी क्वारन्टाईनमध्ये थांबण्याचा संयम नसतो. चाचणी अहवालही त्यांना ताबडतोब हवा असतो. ‘मला घरी पाठवा मी अमुक मंत्र्याचा माणूस आहे आणि तमुक नेत्याचा माणूस आहे’, अशी धमक्या म्हणून करतात. दोन डॉक्टरांकडून मिळालेल्या माहितीनुसार दक्षिण गोव्यातील एका नेत्याने एका खलाशाला घरी पाठवण्यासाठी दोन वेळा शिफारस करणारे फोन केले होते. कितीही धमक्या इशारे आले तरी संहिता मोडण्याच्या भानगडीत कुणी डॉक्टर किंवा इतर अधिकारी पडत नसतात. कारण त्यामुळे उद्या विपरित काही घडले तर त्याची जबाबदारी ही संबंधित डॉक्टर किंवा अधिकाऱ्यावर येणार आहे. 

फोन करून दबाव टाकल्यामुळे काहीही परिणाम होत नसल्यामुळे आता वशिलाचे फोन येण्याचे प्रमाण कमी झाले आहे. परंतु काही खलाशांच्या कुरबुरी थांबलेल्या नाहीत. ते घरी जाण्यासाठी अधीर झाले आहेत. त्यांच्या भावना आम्ही समजू शकतो. परंतु परिस्थितीचे गांभीर्यही त्यांनी समजले पाहिजे असेही एका डॉक्टरने सांगितले.

VIDEO: पाकिस्तानातून आलेलं 'ते' संकट महाराष्ट्रात; कोट्यवधींचं नुकसान होण्याची शक्यता

अडकलेल्या मजुरांसाठी 'देवदूत' ठरलेल्या सोनू सूदला गब्बरचा सलाम

राज्य सरकार अपयशी, त्यांना नारळ देऊन राष्ट्रपती राजवट लागू करा; राणेंचं ठाकरे सरकारवर शरसंधान

Web Title: coronavirus sailors using political pressure for leaving quarantine centre in goa kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.