coronavirus: इटलीतून १६८ गोमंतकीयांना घेऊन विशेष विमान मायदेशात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 03:22 PM2020-05-20T15:22:11+5:302020-05-20T15:29:59+5:30

इटलीहून गोव्यात परतलेले हे गोमंतकीय बांधव तीन विदेशी जहाजावर खलाशी म्हणून कामाला असून दाबोळी विमानतळावर पोचल्यानंतर त्यांची ‘कोविड - १९’ बाबतची चाचणी करण्यासाठी त्यांचे येथे नमूने घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आले.

coronavirus: A special plane carrying 168 cowherds from Italy arrived in the Goa | coronavirus: इटलीतून १६८ गोमंतकीयांना घेऊन विशेष विमान मायदेशात दाखल

coronavirus: इटलीतून १६८ गोमंतकीयांना घेऊन विशेष विमान मायदेशात दाखल

Next
ठळक मुद्देइटलीतून १६८ गोमंतकीयांना घेऊन दाबोळी विमानतळावर उतरले खास विमानलॉकडाऊनमुळे विदेशात अडकलेल्या गोमंतकीय बांधवांना घेऊन येणारे ठरले हे पहीले विमानबुधवारी रात्री पर्यंत अन्य दोन विमाने इटली राष्ट्रातून गोमंतकीय बांधवांना घेऊन गोव्यात उतरणार

वास्को: लॉकडाऊन मुळे इटली राष्ट्रात अडकून राहीलेल्या १६८ गोमंतकीय बांधवांना घेऊन पहीले खास विमान बुधवारी (दि. २०) सकाळी १०.३० वाजता दाबोळी विमानतळावर उतरले. इटलीहून गोव्यात परतलेले हे गोमंतकीय बांधव तीन विदेशी जहाजावर खलाशी म्हणून कामाला असून दाबोळी विमानतळावर पोचल्यानंतर त्यांची ‘कोविड - १९’ बाबतची चाचणी करण्यासाठी त्यांचे येथे नमूने घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आले. बुधवारी संध्याकाळी व रात्री अन्य दोन खास विमाने इटलीहून विदेशी जहाजावर खलाशी म्हणून काम करणा-या गोमंतकीय बांधवांना घेऊन येणार असल्याची माहीती दाबोळी विमानतळ संचालक गगन मलिक यांनी दिली.

बुधवारी सकाळी १०.४५ वाजता इटलीहून गोमंतकीय बांधवांना घेऊन आलेले पहीले विमान दाबोळी विमानतळावर उतरले. विमान उतरल्यानंतर सर्व सोपस्कार पूर्ण करून नंतर या १६८ गोमंतकीय बांधवांची दाबोळी विमानतळावरच ‘कोविड - १९’ बाबतची तपासणी करण्यासाठी नमूने (स्वेब टेस्ट) घेण्यात आल्याची माहीती दाबोळी विमानतळ संचालक गगन मलिक यांनी दिली. विदेशी जहाजावर खलाशी म्हणून काम करणाºया व लॉकडाऊन मुळे विदेशात अडकलेल्या गोमंतकीय बांधवांना गोव्यात घेऊन येणारे हे पहीले विमान असल्याचे गगन मलिक यांनी माहीतीत कळविले. बुधवारी अन्य दोन विमाने इटली हून गोमंतकीय बांधवांना घेऊन येणार असून ते सुद्धा विदेशी जहाजावर खलाशी म्हणून कामाला आहेत. दाबोळीवर सकाळी उतरलेल्या व नंतर येणार असलेल्या अन्य दोन विमानात मिळून एकूण ४४१ विदेशी जहाजावर खलाशी म्हणून काम करणारे गोमंतकीय बांधव गोव्यात परतणार असल्याची माहीती मलिक यांनी दिली.

सकाळी पोचलेल्या गोमंतकीय बांधवांची कोविड - १९ बाबत तपासणी करण्यासाठी विमानतळावरच नमूने घेतल्यानंतर येथे उपलब्ध करण्यात आलेल्या बसमधून त्यांना पोलीस सुरक्षेत क्वारंन्टाईन केंद्रावर (हॉटेलमध्ये व्यवस्था) घेऊन गेल्याची माहीती गगन मलिक यांनी दिली. इटलीहून सदर विमाने गोमंतकीय बांधवांना घेऊन येणार असल्याने दाबोळी विमानतळावर कोरोना विषाणूचा धोका निर्माण न व्हावा यासाठी सर्व प्रकारची पावले पूर्वीच उचलण्यात आलेली असल्याचे मलिक यांनी सांगितले. सदर बांधवांची तपासणी करण्यासाठी डॉक्टर तसेच इतर कर्मचारी विमान पोचण्यापूर्वीच दाबोळी विमानतळावर उपस्थित होते. याबरोबरच दाबोळी विमानतळावर येणार असलेल्या या बांधवांची तपासणी करण्यासाठी तसेच इतर विविध पावले योग्य रित्या उचलण्यात आलेली आहेत याची खात्री करून घेण्यासाठी मुरगावचे उपजिल्हाधिकारी परेश फळदेसाई तसेच इतर संबंधित अधिकारी उपस्थित असल्याचे दिसून आले. बुधवारी रात्रीपर्यंत दाबोळीवर अन्य दोन विमाने इटलीहून गोमंतकीय बांधवांना घेऊन आल्यानंतर त्यांची कोविड - १९ बाबत तपासणी करून नंतर त्यांना क्वारंन्टाईन केंद्रावर (हॉटेलात व्यवस्था) घेऊन जाणार असल्याचे सांगितले.

यापूर्वी विदेशी जहाजावर खलाशी म्हणून काम करणा-या गोमंतकीय बांधवांना मुंबईहून रस्तामार्गे गोव्यात आणले

विदेशात अडकलेल्या गोमंतकीय बांधवांना घेऊन बुधवारी आलेले हे पहीले विमान असून बुधवारी रात्री पर्यंत इटलीहून अन्य दोन विमाने गोमंतकीयांना घेऊन येणार आहेत. विमानातून विदेशात अडकलेल्या गोमंतकीय बांधवांना घेऊन येणारे हे पहीले विमान असले तरी यापूर्वी विदेशी जहाजावर काम करणाºया सुमारे १५४ गोमंतकीय बांधवांना गोव्यात आणून त्यांची कोविड - १९ बाबत तपासणी केल्यानंतर त्यांना हॉटेलात क्वारंन्टाईन करण्यात आलेले आहे. मागच्या आठवड्यात सदर १५४ गोमंतकीय बांधवांना बसमधून रस्तामार्गे गोव्यात आणल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करून नंतर त्यांना क्वारंन्टाईन केंद्रात (हॉटेलात व्यवस्था) ठेवण्यात आले होते.

इटलीहून गोमंतकीय बांधवांना घेऊन येणार असलेल्या तिस-या विमानातून गोव्यात अडकलेल्या १०० इटली राष्ट्रातील नागरिकांना पाठवण्यात येणार मायदेशीलॉकडाऊन मुळे गोव्यात विदेशी राष्ट्रातील शेकडो पर्यटक मागच्या काळात अडकून राहीले होते. या विदेशी पर्यटकांना त्यांच्या मायदेशी पाठवण्यासाठी सरकार, दाबोळी विमानतळ प्राधिकरण तसेच इतर संबंधितांनी विविध पावले उचलून लॉकडाऊन च्या सुरवातीच्या काळापासून अजूनपर्यंत सात हजाराहून जास्त पर्यटकांना त्यांच्या मायदेशी पाठवलेले आहे. रशिया, स्पेन, ब्रिटन, इस्त्राईल, जर्मनी इत्यादी विविध राष्ट्रातील विदेशी पर्यटकांना त्यांच्या मायदेशी पाठवण्यासाठी गोव्यात लॉकडाऊन च्या सुरवातीपासून अजून ३७ खास विमाने येथे खाली आल्यानंतर याविदेशी पर्यटकांना घेऊन ती त्यांच्या मायदेशी परतली. बुधवारी रात्री १०.३० च्या सुमारास तिसरे विमान इटली राष्ट्रातून गोमंतकीय बांधवांना घेऊन दाबोळीवर येणार असल्याची माहीती संचालक गगन मलिक यांनी दिली. सदर विमान नंतर पुन्हा गोव्यात अडकलेल्या सुमारे १०० इटली राष्ट्रातील नागरिकांना घेऊन त्यांच्या मायदेशी परतणार असल्याचे गगन मलिक यांनी माहीतीत सांगितले. इटली राष्ट्रातील त्या प्रवाशांना या विमानातून मायदेशी पाठवण्यापूर्वी कोविड - १९ चा या प्रवाशांना कुठलाच धोका निर्माण न व्हावा यासाठी सदर विमानात सुरक्षेच्या दृष्टीने सर्व उपाय करण्यात येणार असल्याचे गगन मलिक यांनी शेवटी सांगितले. 

Web Title: coronavirus: A special plane carrying 168 cowherds from Italy arrived in the Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.