Coronavirus : गोव्यात दीडशे कोविडग्रस्त महिलांची यशस्वी प्रसुती, अर्भकांना लागण नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2020 07:43 PM2020-10-09T19:43:38+5:302020-10-09T19:45:22+5:30

Coronavirus News : प्रसुतीनंतरही अर्भकांना कोविडची लागण झाली नाही. त्यांना लागण होऊ नये म्हणून योग्य ती काळजी घेण्यात आली.

Coronavirus : Successful delivery of 150 infected women in Goa, infants not infected | Coronavirus : गोव्यात दीडशे कोविडग्रस्त महिलांची यशस्वी प्रसुती, अर्भकांना लागण नाही

Coronavirus : गोव्यात दीडशे कोविडग्रस्त महिलांची यशस्वी प्रसुती, अर्भकांना लागण नाही

Next

पणजी - राज्यातील कोविड इस्पितळात गेल्या सहा महिन्यांत एकूण दीडशे गरोदर महिलांची यशस्वीपणो प्रसुती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे प्रसुतीनंतरही अर्भकांना कोविडची लागण झाली नाही. त्यांना लागण होऊ नये म्हणून योग्य ती काळजी घेण्यात आली.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोमेकॉचे डीन डॉ. बांदेकर व अन्य डॉक्टरांच्या उपस्थितीत शुक्रवारी येथे ही माहिती दिली. एका आठ महिन्याच्या अर्भकाचा नुकताच कोविडमुळे बांबोळीच्या गोमेकॉ इस्पितळात मृत्यू झाला. त्यामुळे आपण डॉक्टर बांदेकर यांना फोन केला. अर्भकाचा मृत्यू होणो हे खूप धक्कादायक होते व त्यामुळे आपण विचारणा केली. तेव्हा त्या अर्भकाला जन्मताच शारीरिक व्यवस्थेमध्ये खूप गंभीर असे बिघाड होते असे आपल्याला सांगितले गेले. योगायोगाने त्याला कोविडचीही बाधा झाली. त्यात त्याचा बळी गेला, असे मुख्यमंत्री म्हणाले.

गोव्यात 85.98 टक्के कोविडग्रस्त आतार्पयत आजारातून बरे झाले आहेत. अन्य राज्यांतील प्रमाणाच्या तुलनेत हे प्रमाण खूप मोठे आहे. 95 टक्के जे रुग्ण कोविडमुळे मरण पावले त्यांना अन्य आजारही होते. पाच टक्के रुग्ण हे इस्पितळात उशिरा पोहचल्याने मरण पावले. जर नियोजन व सांख्यिकी खात्याची आकडेवारी कुणीही पाहिली तर गेल्या सहा महिन्यांत गोव्यात जास्त बळी गेलेले नाहीत असे दिसून येईल. गेल्यावर्षी एप्रिलपासून सहा महिन्यांत जेवढे लोक विविध कारणास्तव मरण पावले होते, तेवढेच लोक आता मरण पावले आहेत. एखाद्या महिन्यात किंचित म्हणजे पाच-सहा जास्त मृत्यू झालेले असतील. मात्र मोठी वाढ झालेली नाही, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.

मडगावच्या ईएसआय इस्पितळात दीडशे तरी कोविडग्रस्त महिलांची सुखरुप प्रसुती झाली. अनेकांवर प्रसुतीवेळी श क्रियाही केली गेली. मात्र अर्भकांना कोविडची लागण झाली नाही. हे सकारात्मक चित्रही प्रसार माध्यमांमधून लोकांर्पयत जायला हवे, असे मुख्यमंत्री म्हणाले. मूत्रपिंडाचा गंभीर आजार असलेलाही आपल्या ओळखीचा एक कोविडग्रस्त कोरोनामुक्त झाला आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

 

Web Title: Coronavirus : Successful delivery of 150 infected women in Goa, infants not infected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.