CoronaVirus : गोव्यात आणखी तीन कोरोना रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 07:53 AM2020-05-16T07:53:34+5:302020-05-16T07:53:56+5:30
ते गोव्यात परतल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी केली गेली, त्यापैकी तिघे रॅपिड टेस्टमध्ये पाॅझिटिव्ह आले,
पणजी : गोव्यात कोरोनाचे आणखी तीन रुग्ण शनिवारी पाॅझिटिव्ह सापडले. एकूण सात गोमंतकीय कोलकाताला गेले होते. ते गोव्यात परतल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी केली गेली, त्यापैकी तिघे रॅपिड टेस्टमध्ये पाॅझिटिव्ह आले, असे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी लोकमतला सांगितले. अंतिम चाचणीचा अहवाल अजून आलेला नाही. गोव्यात आता कोरोना रुग्ण संख्या अकरा झाली आहे. सातपैकी चौघांना फॅसिलिटी क्वारंटाईनमध्ये ठेवले गेले तर तिघांना कोरोना इस्पितळात पाठवले गेले आहे, असे राणे यांनी सांगितले. गोवा ग्रीन झोन आहे व कोरोनामुक्त आहे, असे गोवा सरकार सांगत असतानाच अकरा पाॅझिटिव रुग्ण आढळून आल्याने गोव्याला आता अधिक काळजी घ्यावी लागेल. हे नवे तीन रुग्ण दक्षिण गोव्यातील वास्को येथील आहेत.