coronavirus: गोव्यात कोरोनाचे आणखी दोन रुग्ण, एकूण संख्या 47 वर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 11:06 AM2020-05-22T11:06:21+5:302020-05-22T11:07:01+5:30
गोव्यात रेल्वेद्वारे प्रवासी येण्यास आरंभ होताच नवे कोरोना रुग्ण आढळले. दिल्ली व मुंबईहून आलेल्या रेल्वेद्वारे गोव्यात आतार्पयत एकूण तीस कोरोना रुग्ण आढळले. उर्वरित रुग्ण रस्तामार्गे आले.
पणजी - गोवा ग्रीन झोन आहे असे यापूर्वी जाहीर करून गोव्याने त्याविषयी आनंदोत्सवच साजरा केला तरी, गोव्यात गेल्या दहा दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. गुरुवारी दोन नवे कोरोना रुग्ण सापडल्यानंतर शुक्रवारी पुन्हा आणखी दोन कोरोना रुग्ण आढळून आले. हे दोघेही रस्तामार्गे मुंबईहून गोव्यात दाखल झाले होते. त्यांचा एकमेकाशी संबंध नाही. दोघेही चाचणीवेळी कोरोना पॉङिाटीव्ह आढळून आले.
गोव्यात दि. 23 एप्रिलर्पयत कोरोना रुग्णांची संख्या फक्त सात होती. ते सातहीजण सरकारच्या कोविड इस्पितळातील उपचारानंतर ठीक होऊन घरी गेले. चाळीस दिवस गोव्यात एकही नवा कोरोना रुग्ण सापडला नव्हता. त्यामुळे स्थिती चांगली होती. गोवा हे सुरक्षित राज्य आहे व येथे पर्यटन व्यवसाय देखील येत्या दोन महिन्यांत सुरू करता येईल अशी भाषा काही मंत्री व आमदारांनी चालवली होती. तथापि, एकेचाळीसाव्या दिवसापासून गोव्यात नवे कोरोना रुग्ण सापडण्यास आरंभ झाला. सध्याचा आठवडा सुरू झाल्यानंतर लगेच नऊ कोरोना रूग्ण गोव्यात सापडले होते. गोव्यात रेल्वेद्वारे प्रवासी येण्यास आरंभ होताच नवे कोरोना रुग्ण आढळले. दिल्ली व मुंबईहून आलेल्या रेल्वेद्वारे गोव्यात आतार्पयत एकूण तीस कोरोना रुग्ण आढळले. उर्वरित रुग्ण रस्तामार्गे आले.
मुंबईहून येणारे प्रवासी गोव्यासाठी धोकादायक ठरू लागल्याची जनभावना गोव्यात निर्माण झाली आहे. गोवा सरकारलाही तसेच वाटू लागले आहे. सांगली, मुंबई किंवा दिल्लीहून जे प्रवासी गोव्यात येतात, त्यांच्यावर आरोग्य यंत्रणा जास्त लक्ष ठेवते. गुरुवारी एक जोडपे मुंबईहून रेल्वेने आले होते. ते कोरोना पॉङिाटीव्ह आढळल्याने त्यास कोविद इस्पितळात दाखल केले गेले. कोविद इस्पितळात पूर्वी फक्त शंभर खाटांची व्यवस्था होती. आता तिथे दोनशे खाटा ठेवण्यात आल्या आहेत. आरोग्य सचिव निला मोहनन यांच्या मते त्या इस्पितळात आणखी पन्नास खाटा वाढविल्या जातील.