Coronavirus: चार दिवसात दाबोळी विमानतळावर 5441 प्रवाशांची तपासणी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2020 10:26 PM2020-02-03T22:26:58+5:302020-02-03T22:28:38+5:30
सुदैवाने एकही प्रवाशाला कोरोना विषाणूची लागण झाली नसल्याचे तपासणीतून सिद्ध
वास्को: गोव्याच्या दाबोळी विमानतळावर गुरूवार (दि.३०) पासून विदेशातून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना विषाणू ची लागण झालेली आहे काय याबाबत तपासणीस सुरवात करण्यात आलेली असून सोमवार (दि. ३) पर्यंत येथे विदेशातून आलेल्या ५४४१ प्रवाशांना तपासण्यात आलेले आहे. दाबोळी विमानतळावर कोरोना विषाणू ची तपासणी करण्यासाठी ‘थर्मल हेंन्ड स्कॅनर’ बसवण्यात आल्यानंतर विदेशातून आलेल्या प्रवाशांची तपासणीस सुरवात केलेली असून सुदैवाने एकही प्रवाशाला कोरोना विषाणूची लागण झालेली नसल्याचे स्पष्ट झाल्याची माहीती दाबोळी विमानतळ संचालक गगन मलिक यांनी दिली.
दाबोळी विमानतळावर गेल्या चार दिवसापासून विविध देशातून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना विषाणू ची लागण झालेली आहे काय याबाबत तपासणी करण्यात येत आहे. याबाबत अधिक माहीती घेण्यासाठी दाबोळी विमानतळ संचालक गगन मलिक यांना संपर्क केला असता कोरोना विषाणूबाबत विदेशातून येणाºया प्रवाशांची सद्या चौख रित्या तपासणी चालू असल्याची माहीती त्यांनी दिली. तसेच देशातील विविध भागातून दाबोळीवर येणाºया प्रवाशांना सुद्धा कोरोना विषाणूबाबत माहीती तसेच अन्य काही गोष्टींची जाणीव करून देण्यासाठी ‘डेस्क कांऊण्टर’ उभारण्यात आलेला असल्याचे मलिक यांनी माहीतीत सांगितले. विदेशातून येणाºया प्रवाशांची कोरोना विषाणूबाबत तपासणी करण्यासाठी येथे दोन ‘थर्मल हेंन्ड स्कॅनर’ बसवण्यात आल्याबरोबरच तपासणी करण्याकरिता डॉक्टर सुद्धा नियुक्त केले असल्याचे मलिक यांनी सांगितले. गुरूवार पासून कोरोना विषाणूबाबत तपासणी करण्यास सुरवात केल्यानंतर चार दिवसात (सोमवारी) दाबोळीवर विदेशातून आलेल्या ५४४१ प्रवाशांची तपासणी करण्यात आलेली असल्याची माहीती मलिक यांनी दिली. सदर तपासणीच्या दरम्यान सुदैवाने एकही प्रवाशाला कोरोना विषाणूची लागण झालेली नसल्याचे स्पष्ट झालेले असल्याची माहीती मलिक यांनी देऊन येणाºया काळातही ही तपासणी चालूच असणार असल्याचे सांगितले.