देशात राज्यघटना आहे, तोपर्यंत देश एकसंघ - रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2018 08:04 PM2018-02-26T20:04:39+5:302018-02-26T20:04:39+5:30

देशात राज्यघटना आहे, तोपर्यंत देश तुटणार नाही, तो एकसंघ राहील. हा देश तोडण्याचा प्रयत्न करणा-या शक्तींना आम्ही धडा शिकवू, असा इशारा भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी दिला. 

In the country there is constitution, country unity - Ramdas Athavale | देशात राज्यघटना आहे, तोपर्यंत देश एकसंघ - रामदास आठवले

देशात राज्यघटना आहे, तोपर्यंत देश एकसंघ - रामदास आठवले

googlenewsNext

पणजी : देशात राज्यघटना आहे, तोपर्यंत देश तुटणार नाही, तो एकसंघ राहील. हा देश तोडण्याचा प्रयत्न करणा-या शक्तींना आम्ही धडा शिकवू, असा इशारा भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी दिला. 

येथील मिनेङिास ब्रागांझा संस्थेत विविध दलित संघटनांच्यावतीने मंत्री आठवले यांच्यासह खासदार नरेंद्र सावईकर, खा. विनय तेंडुलकर आणि माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा सोमवारी सायंकाळी सत्कार करण्यात आला. त्यावेळी आठवले बोलत होते. याप्रसंगी गोव्यातील आणि महाराष्ट्रीतल रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांची उपस्थिती होती. 

आरणक्षणाच्या मुद्दय़ावर बोलताना आठवले म्हणाले की, दलित आणि सवर्णामध्ये वाद होता कामा नयेत. दलित, आदिवासी आणि ओबीसींच्या 50 टक्के आरक्षणाला हात न लागता उर्वरित 50 टक्के आरक्षणामध्ये मराठा समाज आणि 25 टक्के आरक्षणात एससी, एसटी आणि ओबीसीमध्ये न येणा:या जातींचा समावेश करावा, असे आमचे मत आहे आणि ती भूमिका केंद्र सरकारकडे मांडलेली आहे. याही घटकांना नोकरी आणि शिक्षणात आरक्षण देण्यास दलित समाजाचा अजिबात विरोध नाही, पण आमच्या टक्केवारीला हात लावता कामा नये. मराठा व देशातील इतर काही जातींना आरक्षण देण्यासाठी कायद्यात काही तरतुदी केंद्राला कराव्या लागणार आहेत. 

ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे संविधान हे धर्मग्रंथ माणतात. मुंबईतील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या भूमिपूजनावेळी त्यांनी आरक्षणाला धक्काही न लावण्याचे स्पष्टपणो सांगितले आहे. मात्र, काँग्रेसवाले खुळचट प्रचार करीत आहेत. जे संविधान बदलतील त्यांनाच आम्ही बदलू, असेही त्यांनी निक्षून सांगितले. यावेळी त्यांनी नोटबंदीमुळे बाहेर आलेला काळा पैसा, निरव मोदीला मदत करणा-यांविषयी केंद्राने घेतलेली कडक भूमिका असे सांगत त्यांनी काँग्रेस पक्षाच्या कारभाराचे अधूनमधून आपल्या खुमासदार शैलित वाभाडे काढले. आठवले यांनी भाषणाची सुरुवात कोकणी भाषेतून केली. त्यानंतर त्यांनी आपल्या भाषणात गोव्यावर रचलेले काव्य सादर केले. 

Web Title: In the country there is constitution, country unity - Ramdas Athavale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.