गोव्याचे मंत्री माविनला पुढच्या सुनावणीच्या वेळी प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहण्याचा न्यायालयाचा आदेश
By सूरज.नाईकपवार | Published: April 21, 2023 05:17 PM2023-04-21T17:17:46+5:302023-04-21T17:18:39+5:30
तब्बल चाैवीस वर्षानंतर गुदीन्हो यांच्याविरोधात कथित वीज दर सवलत घोटाळा प्रकरणाची सुनावणी न्यायालयात सुरु झाली आहे.
गोव्यात घडलेल्या कथित वीज घोटाळा प्रकरणातील प्रमुख संशयित व सदयाचे वाहतुक मंत्री माविन गुदीन्हो यांना पुढच्या सुनावणीच्या वेळी न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. शुक्रवारी दक्षिण गोवा प्रधान जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीक्ष इर्शाद आगा यांच्या न्यायालयात हा खटला सुनावणीस आला. पुढील सुनावणी आता शुक्रवार दि. २८ एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता होईल.
आपल्या न्यायालयात खटला वर्ग करण्यात आल्यानंतर गुदीन्हो हे एकदाही न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहिले नाही, शुक्रवारच्या सुनावणीच्या वेळी त्यांना गैरहजर रहण्यास अनुमती देत आहोत मात्र पुढच्या सुनावणीच्या वेळी मात्र त्यांना न्यायालयात हजर रहावे लागेल असे न्यायालयाने बजाविले आहे. गुदीन्हो यांनी यापुर्वी व्हिडीओ कॉन्फरसिंग व्दारे खटल्यात हजर होते.
तब्बल चाैवीस वर्षानंतर गुदीन्हो यांच्याविरोधात कथित वीज दर सवलत घोटाळा प्रकरणाची सुनावणी न्यायालयात सुरु झाली आहे. हा वीज सवलत घोटाळा असून, बेकायदेशीररित्या कोटी रुपयांची सवलत बडया कंपन्यांना दिल्याचा आरोप संशयितावर आहे. तत्कालीन मुख्य वीज अभियंता टी. नागराजन , कृष्ण कुमार , आर.के. राधाकृष्णन , मेसर्स मार्मगोवा स्टील लिं. व मेसर्स ग्लास फायबर,
डिव्हीजन बीनानी झीक यांना या प्रकरणात अन्य संशयित आहेत. बीनानी झिकंतर्फे या खटल्याचे डॉक्युमेन्ट, रिसिप्ट बुक देण्याची मागणी केली होती. त्यावरही न्यायालयात या वेळी युक्तीवाद झाले.