सीआरझेड उल्लंघने पाडा, किनारा नियमन प्राधिकरणाचा आदेश
By admin | Published: August 16, 2016 08:34 PM2016-08-16T20:34:44+5:302016-08-16T20:34:44+5:30
झोपड्या व इतर बांधकामे शोधून ती पाडण्याचा आदेश गोवा किनारा निमन प्राधिकारणाने राज्यातील सर्व पालिका व ग्रामपंचायतींना दिला
ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 16 - किनारा नियमन प्राधिकारणाच्या नियमाचे उल्लंघन करून उभारण्यात आलेल्या झोपड्या व इतर बांधकामे शोधून ती पाडण्याचा आदेश गोवा किनारा निमन प्राधिकारणाने राज्यातील सर्व पालिका व ग्रामपंचायतींना दिला आहे. या आदेशामुळे पुन्हा एकदा किनारी भागात पडझड होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
सीआरझेडच्या नियमांचे उल्लंघन झाले आहे अशा ठिकाणी सर्वेक्षण करण्यात यावे. अशी उल्लंघने करून बांधण्यात आलेली बांधकामे पाडण्यात यावीत असे या आदेशात म्हटले आहे. त्याच बरोबर पाणी पुरवठा विभाग आणि वीज खात्यालाही आदेश पाठविण्यात आले आहेत. सीआरझेड नियमांचे उल्लंघन करून उभारण्यात आलेल्या बांधकामाना देण्यात आलेल्या पाण्याच्या आणि विजेच्या जोडण्या तोडण्यात याव्यात असे त्यात म्हटले आहे.
अशा बांधकामात पर्यटन शक्सनाही सवलत दिली जाणार नाही. पर्यटन शॅक्सही सीआरझेड नियमाचे उव्लंघन करून उभारण्यात आले असतील तर ते पाडावेत असे आदेशात म्हटले आहे. अन्न व औषध प्रशासनालाही प्राधिकारणाकडून सूचना करण्यात आल्या आहेत. अशा प्रकारच्या कोणत्याही बांधकामात कशासाठी परवानगी दिलेली असेल तर ती रद्द करण्यात यावी असे त्यात म्हटले आहे. राष्ट्रीय हरित लवादाच्या निवाड्याला अनुसरून हा आदेश दिला आहे.