जमीन बळकावल्याप्रकरणी आमदाराच्या पत्नीवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2019 05:32 PM2019-01-04T17:32:31+5:302019-01-04T17:33:06+5:30

पाटबंधारे खात्याच्या जमिनीवर अतिक्रमण : आमदार म्हणतात, राजकीय कुभांड

Crime against the wife of the MLA for grabbing land | जमीन बळकावल्याप्रकरणी आमदाराच्या पत्नीवर गुन्हा

जमीन बळकावल्याप्रकरणी आमदाराच्या पत्नीवर गुन्हा

Next

मडगाव: सरकारी मालकीच्या जमिनीवर अतिक्रमण केल्याच्या आरोपाखाली कुंकळ्ळीचे आमदार  क्लाफासियो डायस यांच्या पत्नी सीमा डायस यांच्या विरोधात केपे पोलीस स्थानकात फौजदारी स्वरुपाचा गुन्हा नोंद केला आहे. पाटबंधारे खात्याच्या मालकीची जमीन बळकावून त्यावर डायस यांनी स्टोन क्रशर यंत्रणा उभारल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. सीमा डायस या दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या माजी अध्यक्ष होत्या.


पाटबंधारे खात्याचे अधीक्षक अभियंते मोहन हलकट्टी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ही कारवाई केल्याचे केपे पोलिसांनी सांगितले. डायस यांच्या विरोधात भादंसंच्या 403 (जमीन गैरव्यवहार) आणि 447 (सरकारी जागेवर अतिक्रमण करणो) या कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे. 


दरम्यान, यासंदर्भात बोलताना आमदार डायस यांनी, सदर जमिनीचा मालक कोण याबद्दलचा दावा उच्च न्यायालयात चालू आहे. सदर जमीन सरकारी मालकीची नाही असे सांगितले. केवळ राजकीय हेतूने आपल्या पत्नी विरोधात हा गुन्हा दाखल केल्याचे ते म्हणाले.
या प्रकरणाची माहिती अशी की, केपेजवळ असलेल्या मुळे-पारोडा येथील सव्र्हे क्र. 155/1 मधील सुमारे 8675 चौ.मी. जागेवर सीमा डायस यांच्या मालकीचा क्रशर आहे. ज्या जागेवर हा क्रशर आहे जागा 1984 मध्ये पाटबंधारे खात्याने साळावली सिंचन प्रकल्पाच्या विस्तारासाठी संपादीत केली होती. सदर स्टोन क्रशर पाटबंधारे खात्याच्या कालव्याच्या अगदी जवळ असून हा क्रशर बेकायदेशीर असल्याची तक्रार यापूर्वी पारोडय़ाचे माजी सरपंच गाब्रिएल फर्नाडिस यांनी केली होती.


या तक्रारीनंतर पाटबंधारे खात्याने या क्रशरची पहाणी केली होती. त्या पहाणीनंतर खात्याचे अभियंते हलकट्टी यांनी गुरुवारी केपे पोलीस स्थानकात तक्रार नोंदविली होती.
 

Web Title: Crime against the wife of the MLA for grabbing land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.