पणजीतील प्रसिद्ध मेरी इमॅक्युलेट चर्चचा फेस्तला भाविकांची गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2023 03:14 PM2023-12-09T15:14:25+5:302023-12-09T15:14:30+5:30
आज सकाळी पहाटेपासून प्रार्थनेला लोकांनी गर्दी केली होती.
- नारायण गावस
पणजी : राजधानीतील मेरी इमॅक्युलेट कॉन्सेप्टशन चर्चचे फेस्त उत्साहात व भक्तिमय वातावरणात शुक्रवारी सुरु झाले असून खि्स्तधर्मातील देशभरातून आलेले भाविकांनी येथे सायबिनीचे दर्शन घेतले. आज सकाळी पहाटेपासून प्रार्थनेला लोकांनी गर्दी केली होती.
या फेस्तानिमित्त चर्च चौककडे कडेकोड सुरक्षा व्यावस्था आहे. या धार्मिक कार्यक्रमाप्रमाणे या ठिकाणी विविध मनोरंजनाचे कार्यक्रमही आयोजित केले आहेत. यात संगीत नृत्य, गायन असे विविध कार्यक्रम आहेत. चर्चची फेरी मांडवी तरी घरऱ्यात आली असून चर्चकडे फक्त चणे आणि खाज्यांची दुकाने लावण्यात आली आहेत. शुक्रवारी सकाळपासून मेरी इमॅक्युलेट सायबीनीची मिरवणूक चर्च परिसरात काढण्यात आली. जे भाविक चर्चमध्ये पोहचले नाही, त्यांनी मिरवणुकीत सायबीनीचे दर्शन घेतले.
सध्या पणजीत स्मार्ट सिटीची कामे सुरु असल्याने या ठिकाणी फेरी उभारता येत नाही चर्च चौक हे पर्यटकांचे मु्ख्य आकर्षण आहे. तसेच या बाजूने माेठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने दालन भउरण्यात अडथळा येत असतो.. म्हणून ही फेरी मांडवीतीरी उभारण्यात आली आहे. येते. पंण यंदा फेरी भरण्यास उशीर झाला. शुक्रवारी रात्रीपर्यंत दुकाने उभारण्याचे काम चालू होते.