भर पावसातही पर्यटन स्थळी पर्यटकांची गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2024 04:01 PM2024-07-14T16:01:34+5:302024-07-14T16:02:52+5:30

राज्यातील बहुतांश पर्यटक हे सध्या समुद्र किनारी लाटा मोठ्या वाहत असल्याने धबधबे, चर्च मंदिर, किल्ले तसेच इतर पर्यटन स्थळी गर्दी करत आहे.

Crowd of tourists in tourist places even in heavy rain in goa | भर पावसातही पर्यटन स्थळी पर्यटकांची गर्दी

भर पावसातही पर्यटन स्थळी पर्यटकांची गर्दी

नारायण गावस

पणजी : राज्यात मुसळधार सुरुच आहे तरीही जीवाचा गोवा करण्यासाठी आलेल्या पर्यटकांची संख्या कमी  झालेली नाही. राज्यात शनिवार रविवारच्या साप्ताहिक सुट्टी असल्याने राज्यातील सर्वच पर्यटनस्थळी मुसळधार पावसातही पर्यटकांची गर्दी पहायला मिळाली.

राज्यातील बहुतांश पर्यटक हे सध्या समुद्र किनारी लाटा मोठ्या वाहत असल्याने धबधबे, चर्च मंदिर, किल्ले तसेच इतर पर्यटन स्थळी गर्दी करत आहे. रविवारी ओल्ड  गोवा येथील  जगप्रसिद्ध चर्चवर पर्यटकांनी माेठी गर्दी केली हाेती. रेनकाेट छत्र्या घालून पर्यटक या चर्चला भेट दिली. पावसाने यावेळी  पर्यटक काही प्रमाणात कमी असले तरीही जीवाचा गोवा करणारे पर्यटक भर पावसात पर्यटनाचा आनंद लुटताना दिसले. 

गोवा हे जागतिक पर्यटन स्थळ आहे. गाेव्यात बाराही महिने पर्यटन हंगाम असतो. त्याचप्रमाणे पावसाप्रमाणे उन्हाळी हिवाळी हंगामात पर्यटक राज्यात मोठ्या प्रमाणात येत असतात. आता येणारे बहुतांश पर्यटक हे देशी आहे. विदेशी पर्यटक हे जास्तीत जास्त हिवाळी उन्हाळी हंगामात येत असतात. यंदा हिवाळी हंगाम माेठ्या प्रमाणात देशी विदेशी पर्यटक आले आहेत. गोवा हे आता पर्यटक हब झालेला आहे. पर्यटन खात्याने राज्यात पर्यटक वाढावे यासाठी जगभर प्रचार करत असते. पावसात जास्तीत जास्त पर्यटक हे पावसाळी सहल अनुभवायला येतात.

Web Title: Crowd of tourists in tourist places even in heavy rain in goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.