राज्यात देशी पर्यटकांची गर्दी; समुद्रकिनारे फुलले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2019 06:39 PM2019-11-23T18:39:11+5:302019-11-23T18:39:21+5:30

गोव्यात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरू आहे.

Crowds of native tourists in goa; The beach blossomed | राज्यात देशी पर्यटकांची गर्दी; समुद्रकिनारे फुलले

राज्यात देशी पर्यटकांची गर्दी; समुद्रकिनारे फुलले

googlenewsNext

पणजी: गोव्यात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरू आहे. यावेळी विकेण्डनिमित्ताने राज्यात देशी पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. उत्तर गोव्यातील महत्त्वाचे किनारे पर्यटकांनी फुलले असल्याचे शनिवारी आढळून आले.

राज्यात वार्षिक सरासरी सत्तर लाख पर्यटक येऊन जातात. यात 80 टक्के देशी पर्यटक असतात. यावेळी महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश आदी भागांतून मोठय़ा संख्येने पर्यटक आले आहेत. शेजारील राज्यांतील पर्यटक तर येथे विकेण्डनिमित्तानेच दाखल झाले आहेत. शुक्रवारी सायंकाळपासून देशी पर्यटकांची संख्या गोव्यात वाढण्यास आरंभ झाला. शनिवारी कळंगुट, कांदोळी, सिकेरी, बागा, वागातोर,अंजुणा, आश्वे, मोरजी, मिरामार हे सागरकिनारे पर्यटकांनी फुलले.

पणजीत पन्नासावा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरू आहे. पणजीतील वातावरणाचा हजारो देशी पर्यटक सध्या आस्वाद घेत आहेत. रात्रीच्यावेळी पणजीचे सौंदर्य पर्यटकांच्या डोळ्य़ांचे पारणो फेडते. लांबलचक व उंच अशा तिस:या मांडवी पुलाचेही अनोखे सौंदर्य पर्यटक डोळ्य़ांत साठवून ठेवत आहेत. पणजी ते दोनापावलर्पयत सुंदर अशी रोषणाई सरकारने केली आहे. त्यामुळे मांडवीकिनारी पणजीचे तेज रात्रीच्यावेळी वाढते. चित्रपट महोत्सवानिमित्ताने पणजीत दाखल झालेले प्रतिनिधी गोव्याच्या विविध भागांत फिरून पर्यटनाचाही आनंद घेत आहेत. पणजी बाजारपेठ व अन्य ठिकाणी तर मोठय़ा संख्येने प्रतिनिधी फिरताना दिसून येतात. यामुळे येथील छोटी हॉटेल्स व व्यापा:यांना ग्राहक मिळत आहेत.

शनिवार- रविवारी एरव्हीही पर्यटकांची गोव्यात गर्दी असतेच. जुनेगोवे येथील सेंट ङोवियरच्या फेस्तानिमित्त यापुढे पर्यटकांची संख्या जास्त वाढेल. तसेच नाताळ सणाचा अपूर्व आनंद लुटण्यासाठीही येत्या महिन्यात लाखो पर्यटक गोव्यात असतील. डिसेंबरमध्ये विद्याथ्र्यानाही नाताळाची सुट्टी असेल. त्यावेळी पर्यटकांच्या गर्दीमुळे गोव्यातील रस्तेही अपुरे पडत असतात. सध्या महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ आदी ठिकाणची पर्यटकांची वाहने मोठय़ा संख्येने राज्यात फिरत आहेत. यंदा पाऊस जास्त दिवस पडला. त्यामुळे प्रारंभी पर्यटकांना गोव्याचा जास्त आनंद घेता आला नाही. आता पाऊस नाही व वातावरणही चांगले आहे. कळंगुट, बागा, मिरामार आदी किना:यांवर सायंकाळच्यावेळी पर्यटक समुद्रस्नानाचाही आनंद घेताना दिसून आले.
 

Web Title: Crowds of native tourists in goa; The beach blossomed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.