गोव्यात भातशेती करपली, यंदा 20 टक्के पिक घटण्याची शक्यता 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2018 02:00 PM2018-09-19T14:00:58+5:302018-09-19T14:01:02+5:30

गोव्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने भातशेती धोक्यात आली आहे. प्रखर उन्हामुळे शेती करपण्याच्या स्थितीत आहे. परिणामी सुमारे 20 टक्के पीक घटण्याची शक्यता कृषी खात्याकडून व्यक्त केली जात आहे.

cultivation likely to decrease by 20 percent this year In Goa | गोव्यात भातशेती करपली, यंदा 20 टक्के पिक घटण्याची शक्यता 

गोव्यात भातशेती करपली, यंदा 20 टक्के पिक घटण्याची शक्यता 

googlenewsNext

पणजी : गोव्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने भातशेती धोक्यात आली आहे. प्रखर उन्हामुळे शेती करपण्याच्या स्थितीत आहे. परिणामी सुमारे 20 टक्के पीक घटण्याची शक्यता कृषी खात्याकडून व्यक्त केली जात आहे. पिकाचा आढावा घेण्यासाठी खात्यातर्फे सर्वेक्षण हाती घेण्यात येणार आहे. खात्याचे संचालक नेल्सन फिगरेदो यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी यास दुजोरा दिला. राज्यात सरासरी १८ टक्के कमी पाऊस झालेला आहे. डोंगराळ भागातील शेतीला जास्त झळ पोहोचली आहे. सासष्टीसारख्या तालुक्यात भातपिकाची लागवड लवकर होते. तेथे पिक तयार झालेले आहे त्यामुळे फारशी समस्या उद्भवणार नाही. कणस तयार होऊन रोपटे वाकले आहे, अशा ठिकाणी परिणाम होणार नाही. कारण सप्टेंबर अखेरीस कापणीसाठी हे पिक तयार होईल. काणकोण, धारबांदोडा आदी डोंगराळ भागात भातपिकावर मोठा परिणाम झालेला आहे. 

फिगरेदो म्हणाले की, ‘गेल्या वर्षी दर हेक्टरी सरासरी ३९३0 किले भातपिक मिळाले होते. यंदा हे प्रमाण १५ ते २0 टक्क्यांनी घटणार आहे. १0 जुलैनंतर ज्या ज्या भागात लागवड झाली तेथे जास्त परिणाम होईल. तिसवाडी, बार्देसमध्येही पिकावर परिणाम जाणवणार आहे.’हळदोणे भागात पिक करपल्याचे स्वत: आपल्याला आढळून आल्याचे फिगरेदो यांनी या प्रतिनिधीला सांगितले. 

दक्षिण गोव्यातील काणकोण व केपें तालुक्यांमध्ये ११ गावांमधील सुमारे ३ हजार शेतक-यांना याचा फटका बसला आहे. मान्सूनने गेले अनेक दिवस दडी मारलेली आहे. प्रखर उन्हामुळे उष्म्यातही वाढ झालेली असून आॅक्टोबरचा उष्मा आतापासूनच जाणवू लागला आहे.  काणकोण तालुक्यात सात गावांमध्ये सुमारे १६00 हेक्टर जमिनीत भात लागवड केली जाते तर केपे तालुक्यात सुमारे ३ हजार हेक्टर क्षेत्रात भातपिक घेतले जाते. चार गावांमध्ये तर डोंगराळ भागात लागवड केली जाते. 

काणकोणचे विभागीय कृषी अधिकारी चंद्रहास देसाई म्हणाले की, गेले नऊ दिवस पावसाचा थेंबही नाही. पुढील ७२ तासात पाऊस झाला नाही तर पिकावर गंभीर परिणाम होईल. जमीन १२ दिवसपर्यंत पाणी ठेवू शकते. ६0 ते ७0 टक्के शेती पूर्णपणे पावसावर अवलंबून असते. कारण हा डोंगराळ भाग आहे. 

कडक ऊन आणि उष्म्यामुळे भातशेती नष्ट होण्याचा प्रकार गेल्या आठ वर्षात प्रथमच होत आहे. देसाई म्हणाले की, आम्ही शेतीच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केलेली आहे. पिकावर ऊन्हाचा परिणाम होऊन भातशेती करपल्याचे काही ठिकाणी स्पष्टपणे दिसून आले आहे. 

काणकोणच्या विभागीय कृषी अधिकाºयाने दिलेल्या माहितीनुसार आगोंदा, खोला, खोतिगांव, गांवडोंगरी, लोलयें, पोळें, पैंगीण श्रीस्थळ आदी गावांमध्ये एकूण सुमारे १६00 हेक्टर जमिनीत भातपिक घेतले जाते. या शेतकºयांची मोठी हानी झालेली आहे. पकाची हानी झाल्यास शेतकरी आधार निधीतून अर्थसाहाय्य मिळविणे हा एकच पर्याय आहे. 

केपेंचे विभागीय कृषी अधिकारी सत्यवान देसाई म्हणाले की,‘आम्ही बारकाईने स्थितीवर नजर ठेवून आहोत. बार्से, कावरे, मळकर्णे व मोरपिर्ला भागात शेतीला धोका पोचलेला आहे. सप्टेंबरच्या याच कालावधीत पिकाला जास्त पाणी लागते. यावर्षी राज्यात सुमारे ३0 हजार हेक्टर जमिनीत भाताची लागवड झालेली आहे. 

दरम्यान, काल रात्री राज्यातील काही भागात पावसाच्या हलक्याशा सरी कोसळल्या त्यामुळे शेतकºयांच्या आशा पल्लवित झाल्या. परंतु आज सकाळपासून पुन्हा कडक ऊन पसरले आहे. 

Web Title: cultivation likely to decrease by 20 percent this year In Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.