गोव्याच्या राजधानीबाहेर होणाऱ्या कार्निव्हलविषयी उत्सुकता
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2018 09:59 PM2018-02-09T21:59:52+5:302018-02-09T22:00:10+5:30
खा प्या मजा करा’ याचा संदेश देणारा कार्निव्हल उद्या, शनिवारी पणजीत साजरा होत आहे. पहिल्यांदाच शहाराच्या बाहेर हा कार्निव्हल होत असल्याने त्याबाबत आयोजकांसह सर्वांनाच उत्सुकता आहे.
पणजी - खा प्या मजा करा’ याचा संदेश देणारा कार्निव्हल उद्या, शनिवारी पणजीत साजरा होत आहे. पहिल्यांदाच शहाराच्या बाहेर हा कार्निव्हल होत असल्याने त्याबाबत आयोजकांसह सर्वांनाच उत्सुकता आहे.
पूर्वी कार्निव्हलची राजधानीतील मिरवणूक जुन्या सचिवालयापासून सुरू होत होती ती मिरामार्पयत जात होती. या मिरवणुकीमुळे बांदोडकर मार्ग पूर्णपणो बंद ठेवावा लागत होता. त्यामुळे शहरांतर्गत रस्त्यांवर वाहतुकीचा खोळंबा होत होता. याचा विचार करून अखेर गोवा राज्य पर्यटन खात्याने कार्निव्हलची मिरवणूक शहराबाहेर नेण्याचा निर्णय घेतला. आता ही मिरवणूक मिरामार ते दोनापावल या मार्गावर होणार असल्याने याबाबत अधिक उत्सुकता आहे. कारण कार्निव्हल गोव्यात सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच ही मिरवणूक शहराबाहेर होत आहे. सध्या शहरातील मुख्य मार्गावर कार्निव्हलचे फलक लावण्यात आले आहेत. या फलकांवर त्यामुळे कार्निव्हल होत आहे, असे दिसत असले तरी नेहमीची रोषणाई आणि मांडवी किनारी मंडप उभारण्यासाठी चाललेली तयारी कार्निव्हलच्या आदल्या दिवशी पहायाला मिळाली नाही. ही सर्व लगबगही कार्निव्हल मिरवणुकीमुळे मिरामार ते दोनापावल रस्त्याकडे स्थलांतरित झाली आहे. राजधानीत येणारा पर्यटक या कार्निव्हल मिरवणुकीत सहभागी होत होता, पण आता खास मिरवणुकीसाठी मिरामारकडे जाणा:यांची संख्या किती असेल, हे उद्या होणा:या गर्दीवरून कळणार आहे.