दाबोळी विमानतळावर कस्टम अधिकाऱ्यांनी पकडले १ किलो ५३८ ग्राम तस्करीचे सोने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 08:21 PM2020-03-17T20:21:46+5:302020-03-17T20:22:02+5:30
सलग दोन दिवसात दोन वेगवेगळ्या कारवाईत दाबोळी विमानतळावर पकडण्यात आले १ कोटी ६९ लाख २५ हजार ८८४ रुपयांचे तस्करीचे सोने
वास्को: सोमवारी उशिरा रात्री गोव्याच्या दाबोळी विमानतळावर दुबईहून आलेल्या ‘ओमान एअर’ विमानातील एका प्रवाशाकडून कस्टम विभागाने १ किलो ५३८ ग्राम तस्करीच्या सोन्याच्या बिस्कीट जप्त केल्या. कस्टम विभागाने जप्त केलेल्या या तस्करीच्या सोन्याच्या बिस्कीटांची एकूण किंमत ५७ लाख ६७ हजार आहे. दाबोळी विमानतळावर कस्टम विभागाने सलग दोन दिवसात दोन वेगवेगळ््या प्रकरणात एकूण ४ किलो ५५९ ग्राम तस्करीचे सोने पकडलेले असून दोन्ही प्रकरणात पकडण्यात आलेल्या या सोन्याची एकूण किंमत १ कोटी ६९ लाख २५ हजार ८८४ रुपये आहे.
दाबोळी विमानतळावरील कस्टम विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार सोमवारी उशिरा रात्री सदर कारवाई करण्यात आली. सोमवारी रात्री दुबईहून मस्कत मार्गे होत गोव्याच्या दाबोळी विमानतळावर उतरलेल्या ‘ओमान एअर’ (डब्ल्यु व्हाय ०२०९) विमानातील प्रवाशांची तपासणी करण्यात येत असताना कस्टम अधिकाऱ्यांना एका प्रवाशावर संशय आला. या प्रवाशाला बाजूला आणून त्याची चौकशी करण्यास सुरवात केली असता सदर प्रवाशी भटकळ, कर्नाटक येथील असल्याचे कस्टम अधिकाºयांना स्पष्ट झाले. यानंतर त्याच्या सामानाची तपासणी केली असता त्यांने ‘चेक इम बॅगेज’ मध्ये सोन्याच्या बिस्कीटा लपवून आणल्याचे स्पष्ट झाले.
कस्टम अधिकाºयांने पकडलेल्या त्या प्रवाशांने विविध वजनाच्या १४ सोन्याच्या बिस्कीट सामानात लपवून आणल्याची माहीती सूत्रांनी देऊन या तस्करीच्या सोन्याचे एकूण वजन १ किलो ५३८ ग्राम असल्याचे सांगितले. या तस्करीच्या सोन्याची कींमत ५७ लाख ६७ हजार असल्याची माहीती कस्टम अधिकाºयांनी दिली आहे. सदर प्रकरणात कारवाई करत नंतर कस्टम अधिकाºयांनी १९६२ च्या कस्टम कायद्याखाली सदर तस्करीचे सोने जप्त केले. या प्रकरणात दाबोळी विमानतळावरील कस्टम अधिकारी अधिक तपास करीत आहेत.
दाबोळी विमानतळावरील कस्टम अधिकाºयांनी सलग दोन दिवसात दोन वेगवेगळ््या कारवाई करून एकूण १ कोटी ६९ लाख २५ हजार ८८४ रुपयांचे तस्करीचे सोने पकडलेले आहे. या सोन्याचे एकूण वजन ४ किलो ५५९ ग्राम आहे. रविवारी (दि.१५) कस्टम अधिकाºयांनी दुबईहून दाबोळी विमानतळावर उतरलेल्या एका विमानाच्या शौचालयातून लपवलेले २ किलो ९७६ ग्राम लपवलेले तस्करीचे सोने जप्त केले होते. सदर विमान दाबोळी विमानतळावरून नंतर बंगळुरुला जाणार होते. सोने ताब्यात घेतल्यानंतर ते कोणाचे आहे काय याबाबत कस्टम अधिकाºयांनी प्रवाशांशी विचारपूस केली असता त्या सोन्यावर कोणी दावा केला नसल्याने नंतर ते जप्त करण्यात आले होते.
या आर्थिक वर्षात अजून पर्यंत दाबोळी विमानतळावर पकडले ३ कोटी ४३ लाख रुपयांचे तस्करीचे सोने
यंदाच्या आर्थिक वर्षाच्या सुरवातीपासून (१ एप्रिल २०१९) अजून पर्यंत कस्टम अधिकाºयांनी दाबोळी विमानतळावर ३ कोटी ४६ लाख रुपयांचे तस्करीचे सोने जप्त केले आहे. या आर्थिक वर्षात कस्टम अधिकाºयांनी १५ मार्च २०२० रोजी या वर्षातील सर्वांत मोठे तस्करीच्या सोन्याचे प्रकरण पकडलेले असून यात १ कोटी ११ लाख ५८ हजार ८८४ रुपयांचे तस्करीचे सोने जप्त करण्यात आले होते. यंदाचे आर्थिक वर्ष संपण्यास १४ दिवस राहीलेले असून या आर्थिक वर्षात कस्टम अधिकारी आणखीन तस्करीच्या सोन्याची प्रकरणे दाबोळी विमानतळावर पकडणार काय हे येणाºया काही दिवसातच स्पष्ट होईल.