गोव्यात समुद्राला उधाण, पर्यटकांसाठी धोक्याचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2019 03:36 PM2019-06-12T15:36:43+5:302019-06-12T15:38:38+5:30
वायू चक्रीवादळाने जरी गोव्यापासून आपली पाठ वळवली असली तरी या वादळाच्या परिणामामुळे गोव्यातील समुद्र बुधवारीही खवळलेल्या अवस्थेतच होते.
मडगाव - वायू चक्रीवादळाने जरी गोव्यापासून आपली पाठ वळवली असली तरी या वादळाच्या परिणामामुळे गोव्यातील समुद्र बुधवारीही खवळलेल्या अवस्थेतच होते. आपली नेहमीची पातळी ओलांडून समुद्राचे पाणी अगदी काठावर आल्याने पर्यटकांनी कुठल्याही परिस्थितीत पाण्यात उतरु नये असा इशारा त्यांना देण्यात आला होता.
सोमवारी रात्री समुद्राचे पाणी वर येऊ लागल्याने किनारपट्टी भागात काहीसे घबराटीचे वातावरण पसरले होते. दक्षिण गोव्यातील पाळोळे, गालजीबाग, बाणावली, कोलवा, बोगमोळो या गजबजलेल्या किना:यावर सुरक्षेचे उपाय घेण्याच्या सुचना जिल्हाप्रशासनाने जारी केला होता.
बोगमोळो-वास्को येथे समुद्राच्या पाण्याची पातळी वाढून मंगळवारी रात्री अगदी रस्त्याजवळ पाणी आल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. समुद्र किना-याजवळ असलेल्या काही हॉटेलांतही पाणी घुसल्याने सर्वाची तारांबळ उडाली. सध्या मासेमारी बंद असल्याने मासेमा:यांनी आपल्या होडय़ा किना:यावर आणून ठेवल्या होत्या. मात्र खवळलेल्या दर्यामुळे या होडय़ांची बरीच नुकसानी झाली.
उत्तर गोव्यातही यामुळे तडाखा बसला. उत्तर गोव्यातील सर्वात लोकप्रिय समुद्र किनारा असलेल्या हरमल किना-यावर दर्याच्या पाण्याची पातळी वाढून वेगाने लाटा किना:यावर धडकल्या आणि त्यामुळे किना-यावरील काही हॉटेलातही पाण्याचे लोट आत शिरले.
दरम्यान, बुधवारी दुपारी पुन्हा एकदा सोसाटय़ाचा वारा सुरु झाल्याने दक्षिण गोव्यातील कुडचडे परिसरात मोठय़ा प्रमाणावर झाडे उन्मळून पडली. काही झाडे घरांवर पडल्याने मोठया प्रमाणात नुकसानी झाली. वादळी वा:यामुळे वीज यंत्रणोतही बिघाड झाल्याने मंगळवारी रात्री अर्धा गोवा अंधारात होता.