फ्लॅटमध्ये आग लागून सिलिंडराचा स्फोट, सुदैवाने जीवितहानी टळली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2019 11:53 AM2019-11-15T11:53:17+5:302019-11-15T11:54:10+5:30
फ्लॅटला आग लागून आतील गॅस सिलिंडराचा स्फोट होण्याची घटना गोव्यातील मडगाव शहरातील माडेल येथे काल रात्री घडली.
मडगाव: फ्लॅटला आग लागून आतील गॅस सिलिंडराचा स्फोट होण्याची घटना गोव्यातील मडगाव शहरातील माडेल येथे काल रात्री घडली. सुदैवाने यावेळी फ्लॅटमध्ये कुणी नसल्याने प्राणहानी टळली. या दुर्घटनेत एकूण दोन लाखांची हानी झाली. मडगाव अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी जाउन आग आटोक्यात आणताना पंधरा लाखांची मालमत्ता बचाविली. आग विझविण्यासाठी एका बंबचा वापर करण्यात आला.
काल गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली. येथील कदंब बस स्थानकाशेजारी असलेल्या कंदबा आकार्डे इमारतीतील दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये ही आग लागली. स्टेनलियो डायस यांच्या मालकीचा हा फ्लॅट आहे. रात्री आग लागल्याचे पाहून इमारतीत राहणाºया अन्य रहिवाशांनी त्वरीत यासंबधीची माहिती मडगाव अग्निशामक दलाच्या कार्यालयाला दिली. दलाचे अधिकारी दोमिंगोस एफ गामा यांच्या मार्गदर्शनाखाली माहिर कळंगुटकर, कृषाल गावडे, महादेव वरक व निलेश मुळी यांनी घटनास्थळी धाव घेउन एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली.
आगीत रेफ्रिजरेटर, स्वयंपाक घरातील वस्तू जळून खाक झाल्या. फातोर्डा पोलिसांनीही मागाहून घटनास्थळी जाउन पहाणी केली.