दाबोळी विमानतळ २०१८ सालात विविध विषयावरून चर्चेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 10:47 PM2018-12-24T22:47:59+5:302018-12-24T22:48:07+5:30

वास्को: गोव्याचा दाबोळी विमानतळ २०१८ वर्षात विविध विषयामुळे अनेक वेळा चर्चेत आला. दाबोळी विमानतळावरील प्रवाशांना सेवा देणारे काळ््या पिवळ््या ...

dabolim airport in the year 2018, discusses various topics | दाबोळी विमानतळ २०१८ सालात विविध विषयावरून चर्चेत

दाबोळी विमानतळ २०१८ सालात विविध विषयावरून चर्चेत

Next

वास्को: गोव्याचा दाबोळी विमानतळ २०१८ वर्षात विविध विषयामुळे अनेक वेळा चर्चेत आला. दाबोळी विमानतळावरील प्रवाशांना सेवा देणारे काळ््या पिवळ््या टॅक्सी चालकांनी ह्या वर्षात विविध कारणावरून विमानतळ प्राधिकरणाच्या विरुद्ध आंदोलन छेडल्याचे दिसून आले. दाबोळीवर विमान उभ्या करण्याच्या क्षमता वाढवण्यासाठी व नवीन टर्मिनल इमारतीच्या विस्तारीकरणासाठी येथील जुनी टर्मिनल इमारत पाडण्याच्या कामाला २०१८ मध्ये सुरवात केली असून इमारत पाडण्याचे काम एकंदरीत पूर्ण झाले आहे. विमानतळाच्या विकासासाठी ह्या वर्षी अनेक पावले उचलण्यात आली असून यात प्रवाशांना विमानात जाण्यासाठी बांधण्यात आलेल्या तीन नवीन ‘एरो ब्रीज’ चे उद्घाटन, दाबोळी विमानतळावरील शौचालयांची नूतनीकरणे व शौचालय सुविधेत वाढ अशा प्रवाशांच्या हीतासाठी विविध सेवेत २०१८ मध्ये वाढ करण्यात आली आहे.
२०१८ मध्ये दाबोळी विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांच्या हीतासाठी अनेक विकास कामे करण्यात आल्याबरोबरच विविध विषयांमुळे दाबोळी विमानतळ अनेक वेळा बातमीत आल्याचे दिसून आले. प्रवाशांना वाहतूक सेवा देणा-या काळ््या - पिवळ््या टॅक्सी चालकांनी विविध विषयावरून विमानतळ प्राधिकरणाविरुद्ध आंदोलन छेडल्याचे ह्या वर्षात दिसून आले. यात टॅक्सी चालकांकडून बाहेर जाताना पैसे घेणे, विमानतळावर अन्य एक खासगी व्यवस्थापनाला टॅक्सी कांउण्टर दिल्याने, गोवा माइल्स आॅनलाइन टॅक्सी सेवेला काउण्टर (माहितीसाठी) दिल्याने, पार्कींग इत्यादी मुद्यावरून टॅक्सी चालकांनी ह्या वर्षभरात अनेक वेळा आंदोलने छेडली. मागच्या वर्षापैक्षा ह्या वर्षी दाबोळी विमानतळावर पर्यटक हंगामाच्या काळात विदेशी पर्यटकांना घेऊन येणाºया चार्टर विमानाच्या संख्येतही कपात झालेली असून यामुळे थोड्या प्रमाणात गोव्याच्या पर्यटक व्यवसायाला मार बसला असावा. एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ ह्या आर्थिक वर्षात दाबोळीवर ७५ लाख राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रवाशांना हाताळण्यात आलेले असून एप्रिल २०१८ सालापासून अजून पर्यंत हाताळण्यात आलेल्या प्रवाशाच्या संख्येत मागच्या वर्षापेक्षा वाढ झाल्याची माहिती दाबोळी विमानतळ संचालक बी.सी.एच नेगी यांनी दिली. मार्च २०१९ ह्या एका आर्थिक वर्षाच्या काळात दाबोळी विमानतळावर ८५ लाख प्रवाशी हाताळण्यात येणार असल्याचा अंदाज नेगी यांनी व्यक्त केल्याने पूर्वीच्या वर्षापैक्षा ह्या संख्येत १० लाखाची वाढ होणार असल्याचे समजते. दाबोळी विमानतळाच्या विविध सुविधांच्या विस्तारीकरणाचे काम सध्या जोरात चालू असून यासाठी येथील जुनी टर्मिनल इमारत जमिनदोस्त करण्याचे काम काही महिन्यापूर्वी सुरू केल्यानंतर सदर इमारत पाडण्याचे काम एकंदरीत पूर्ण झाले आहे. दाबोळीवर सध्या ८ ‘टॅक्सी बे’ (विमान उभी करण्याची जागा) असून ह्या वर्षी अन्य एक ‘पेरलल टॅक्सी बे’ बांधण्याचे काम हातात घेण्यात आलेले आहे. तसेच ह्या वर्षाच्या अखेरपर्यंत जुनी टर्मिनल इमारत जमिनदोस्त केल्यानंतर मार्च २०१९ मध्ये अन्य तीन ‘टॅक्सी बे’ (विमान उभी करण्याची जागा) बांधण्याच्या कामाला सुरवात करण्यात येणार असून भविष्यात दाबोळीवर ११ विमाने उभी करण्याची सुविधा उपलब्ध झाल्यानंतर प्रवाशांना येथे आणखीन जास्त सुविधा उपलब्ध होणार असल्याचे संचालक नेगी यांनी माहिती दिली. विमानात प्रवेश करण्यासाठी नवीन टर्मिनल इमारतीत पूर्वी ५ ‘एरो ब्रीज’ असून २०१८ मध्ये अन्य तीन ‘एरो ब्रीज’ चे उद्घाटन केल्याने येथे ८ ‘एरो ब्रीज’ झाले असून यामुळे प्रवासी सेवेत आणखीन सुधारणा झाली आहे. याबरोबरच ह्याच वर्षी आणखीन ३ ‘एरो ब्रीज’ बांधण्याचे काम हातात घेण्यात आले असून २०१९ सालात हे काम पूर्ण होणार असा विश्वास नेगी यांनी दशर्विला. पुढच्या वर्षी अर्थात फेब्रुवारी २०१९ मध्ये दाबोळी नवीन टर्मिनल इमारतीचे वाढवीकरण व विस्तारीकरणाचे काम सुरू करण्यात येणार असून याबरोबरच अन्य अनेक विकासकामे प्रवाशांच्या हितासाठी हातात घेण्यात येणार असल्याची माहिती नेगी यांनी दिली. ह्या वर्षात दाबोळी विमानतळावर ७० कोटी रुपयांची विविध विकासकामे हातात घेण्यात आलेली असून यापैंकी काही कामे पूर्ण झाली आहेत तर काही पुढच्या वर्षात पूर्ण होणार असल्याचे नेगी यांनी सांगितले. दाबोळी विमानतळावर प्रवाशांना वाहतूक सेवा देणाºया काळ््या - पिवळ््या टॅक्सी चालकांची असलेली ‘पार्कींग’ समस्या दूर करण्यासाठी त्यांना जागा देण्यात आलेली असल्याचे नेगी यांनी सांगून त्यांची ही समस्या दूर झाल्याचे सांगितले. दाबोळी विमानतळावर येणाºया वाहनांच्या पार्कींगसाठी येथे बांधण्यात आलेल्या पार्कींग इमारतीत सुरक्षेच्या दृष्टीने काही त्रृटी असल्याने ती मागच्या काही वर्षापासून बंदच आहे. यात असलेल्या सुरक्षतेच्या दृष्टीतील त्रृटी दूर करण्याचे काम चालू असून २०१९ सालात ती सेवेत रुजु होण्याची शक्यता नेगी यांनी व्यक्त केली. २०१८ मध्ये ज्यापद्धतीने दाबोळी विमानतळाच्या विकासासाठी विमानतळ प्राधिकरणाने पावले उचललेली आहेत त्याच्यापेक्षा जास्त पावले २०१९ सालात प्राधिकरण उचलणार असून भविष्यातही प्रवाशांना आणखीन चांगल्या सुविधा मिळाव्या यासाठी काम करण्यात येणार असे ते शेवटी म्हणाले.

आत्तापर्यंत कस्टम विभागाने दाबोळी विमानतळावर अडीच कोटी रुपयांची तस्करी जप्त
दाबोळी विमानतळावर कस्टम विभागाने २०१८ च्या आर्थिक वर्षाच्या सुरवातीपासून आतापर्यंत (१७ नोव्हेंबर २०१८ पर्यंतचा आकडा) १३ विविध प्रकरणात साडेसात किलो तस्करीचे सोने जप्त केले आहे तर अन्य काही प्रकरणात ६९ लाख रुपयांची विदेशी चलने येथे प्रवाशांकडून जप्त करण्याची कारवाई कस्टम विभागाने केली. कस्टम विभागाने केलेल्या कारवाईत जप्त करण्यात आलेले तस्करीचे सोने, विदेशी चलने व इतर सामग्रीची एकूण रक्कम २ कोटी ५० लाख रुपये होत असल्याची माहिती विभागाच्या अधिका-यांनी दिली.

दाबोळी विमानतळावर यंदा ‘बर्ड हीट’ च्या घटना नाहीत
दाबोळी विमानतळावर उतरणा-या तसेच उड्डाण घेणा-या विमानांना पक्षी आपटून धोका निर्माण होणा-या घटना मागील काही वर्षात अनेक वेळा ऐकायला यायच्या, मात्र २०१८ सालात अशा प्रकारच्या घटना एकायला आल्या नाहीत. पक्षी आपटल्याने विमानांना धोका निर्माण होतो व अशा घटना घडू नये यासाठी नौदल तसेच इतर संबंधीत यंत्रणे सतत पावले उचलत असल्याचे विमानतळ संचालक नेगी यांनी त्यांच्याशी चर्चा करताना सांगितले.

Web Title: dabolim airport in the year 2018, discusses various topics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा