भावजयीवर हल्ला करून दिराची आत्महत्या
By admin | Published: May 13, 2017 02:14 AM2017-05-13T02:14:20+5:302017-05-13T02:18:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्कमये (डिचोली) : कोयत्याने मानेवर वार करून दिराने भावजयीवर प्राणघातक हल्ला केल्यानंतर स्वत: गळफास लावून आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
मये (डिचोली) : कोयत्याने मानेवर वार करून दिराने भावजयीवर प्राणघातक हल्ला केल्यानंतर स्वत: गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना तिखाजन-मये येथे शुक्रवारी घडली. रामदास ठाणेकर (६0) असे मृत व्यक्तीचे नाव असून सुमन सत्यवान ठाणेकर (४७) या हल्ल्यात जखमी झाल्या
आहेत. दरम्यान, सुमन ठाणेकर यांना बांबोळीतील गोमेकॉत दाखल केले असून त्यांची प्रकृती सुधारत आहे.
ही घटना शुक्रवार, दि. १२ मे रोजी दुपारी १२ वाजता घडली. रामदास याची मानसिक स्थिती बिघडली होती. सकाळपासून तो मोठमोठ्याने ओरडत शिवीगाळ करत होता. याच दरम्यान सुमन ठाणेकर यांच्यावर त्याने राग काढला.
घरातून कोयता आणून त्याने सुमन
यांच्यावर वार केला. मानेवर केलेल्या वारामुळे सुमन खाली कोसळल्या. रामदासने त्यांच्यावर आणखी वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेजारी धावून आल्याने रामदासने तेथून पलायन केले व दाराला कडी लावून घरात लपून बसला.
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सुमन यांना शेजारी व घरच्या लोकांनी खासगी वाहनात घालून डिचोली येथील हॉस्पिटलमध्ये नेले. तेथून बांबोळी येथे गोवा मेडिकल कॉलेज इस्पितळात दाखल करण्यात आले.