दामोदर मंगलजी कंपनीची एसआयटीकडून चौकशी
By admin | Published: June 1, 2017 02:19 AM2017-06-01T02:19:16+5:302017-06-01T02:20:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्कपणजी : फोमेन्तो कंपनीनंतर दामोदर मंगलजी खाण कंपनीचे संचालक गोपाल धारवाडकर यांची बुधवारी एसआयटीकडून खनिज घोटाळा
लोकमत न्यूज नेटवर्क
पणजी : फोमेन्तो कंपनीनंतर दामोदर मंगलजी खाण कंपनीचे संचालक गोपाल धारवाडकर यांची बुधवारी एसआयटीकडून खनिज घोटाळा प्रकरणात कसून चौकशी करण्यात आली. लिजांचे बेकायदेशीरपणे हस्तांतरण आणि ‘अंडर इनवॉयसिंग’ पद्धतीने रॉयल्टीची चोरी या मुद्द्यावरून विचारलेल्या प्रश्नांवर त्यांच्याकडून मिळालेली उत्तरे आणि प्रत्यक्षात कागदपत्रांवरील नोंदी यात तफावत दिसून आली, अशी माहिती सूत्रांनी दिली.
३५ हजार कोटी रुपयांच्या खाण घोटाळा प्रकरणात खाण कंपन्यांची चौकशी दुसऱ्या दिवशीही चालू ठेवण्यात आली. बुधवारी दामोदर मंगलजी कंपनीच्या संचालकांची दिवसभर चौकशी करण्यात आली. धेंपो कंपनीचे खाण लिज या कंपनीकडून हस्तांतर करण्याच्या प्रक्रियेबाबत प्रश्न विचारण्यात आले. मिनरल कन्सेशन कायद्यानुसार लिजचे हस्तांतर दोन कंपन्यांमध्ये परस्पर होऊ शकत नाही. या कायद्याचा भंग करण्यात आल्याचे एसआयटीने कंपनीला सुनावले. त्या बाबतची सर्व कागदपत्रे एसआयटीने मागितली आहेत.
दरम्यान, गुरुवारी जी. एन. अगरवाल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची चौकशी करण्यात येणार असून कंपनीच्या संचालकांना सकाळऐवजी दुपारी ३ वाजता बोलविण्यात आले आहे.