नशेत दारुची बाटली ट्रकच्या बाहेर फेकून देण्याचे भलतेच डेअरिंग अंगलट आले; गुन्हा नोंद
By सूरज.नाईकपवार | Updated: May 26, 2024 10:57 IST2024-05-26T10:56:59+5:302024-05-26T10:57:21+5:30
गोव्यातील सासष्टीतील कुंकळ्ळी पोलिस ठाण्याच्या हद्दीत वरील घटना घडली.

नशेत दारुची बाटली ट्रकच्या बाहेर फेकून देण्याचे भलतेच डेअरिंग अंगलट आले; गुन्हा नोंद
सूरज नाईकपवार, लोकमत न्युज नेटवर्क, मडगाव : दारुच्या नशेत ट्रक चालविताना दारुची बाटली बाहेर फेकून देण्याचे भलतेच साहस एका ट्रक चालकाच्या अंगलट आले. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा नोंद केला आहे. दारुची बाटली एका कारवर पडून त्याचे नुकसान झाले. गोव्यातील सासष्टीतील कुंकळ्ळी पोलिस ठाण्याच्या हद्दीत वरील घटना घडली.
विजय कुमार असे संशयिताचे नाव असून, तो मूळ कर्नाटकातील बीदर येथील आहे.भादंसंच्या ३३६,४२९ व मोटर वाहन कायदा कलम १२५ अंतर्गंत संशयितावर गुन्हा नाेंद झाला आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार परेश गावकर पुढील तपास करीत आहेत.
पांझरकणी येथे वरील घटना घडली हाेती. संशयिताने दारुच्या बाटली ट्रकमधून बाहेर फेकून दिली होती. ती एका कारला लागून त्याचे अंदाजे सतरा हजार रुपयांचे नुकसान झाले. या प्रकरणी नंतर विराज फळदेसाई यांनी पोलिसात तक्रार नोंदविली होती.