Dasara Melava: हायकोर्टाच्या आदेशाचा चुकीचा अर्थ लावला जातोय, शिंदेच निर्णय घेतील; दीपक केसरकरांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 09:55 PM2022-09-23T21:55:11+5:302022-09-23T21:56:40+5:30

हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा विजय नव्हेच. मुंबईत बीकेसी मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दसरा मेळावा भरवतील तेव्हा तेथे याचा प्रत्यय येईल. - केसरकर

Dasara Melava: The High Court order is being misinterpreted by Shivsena Thackeray Group, Eknath Shinde will decide; Deepak Kesarkar's warning | Dasara Melava: हायकोर्टाच्या आदेशाचा चुकीचा अर्थ लावला जातोय, शिंदेच निर्णय घेतील; दीपक केसरकरांचा इशारा

Dasara Melava: हायकोर्टाच्या आदेशाचा चुकीचा अर्थ लावला जातोय, शिंदेच निर्णय घेतील; दीपक केसरकरांचा इशारा

Next

पणजी : मुंबईतील दसरा मेळाव्याबाबत हायकोर्टाने दिलेल्या आदेशाचा चुकीचा अर्थ लावला जातोय, असे महाराष्ट्राचे शिक्षण तथा पर्यावरणमंत्री दीपक केसरकर येथे पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

केसरकर म्हणाले की, 'हा निकाल म्हणजे शिवसेना कोणाची हे भासवण्याचा प्रयत्न केला जातोय. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा विजय असा चुकीचा अर्थ यातून काढण्यात येत आहे. जे या गोष्टीचे भांडवल करीत आहे. त्यांनी एक लक्षात ठेवावे की, बाळासाहेबांचे विचार आहे तेथेच लोक येतात आणि मुंबईत बीकेसी मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दसरा मेळावा भरवतील तेव्हा तेथे याचा प्रत्यय येईल.'

केसरकर म्हणाले की, 'शिवसेना कोणाची यावर सर्वोच्च न्यायालयात खटला चालू आहे. असे असताना दसरा मेळाव्याबाबतच्या हायकोर्टाच्या आदेशाचा आधार घेऊन चुकीची माहिती पसरविली जात आहे. आम्ही दसरा मेळावा घेणार असलेले बीकेसी मैदान दादर येथील शिवाजी पार्कपेक्षा तीन पटींनी  मोठे आहे. हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्ट आव्हान द्यावे की नाही, याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील.'

Web Title: Dasara Melava: The High Court order is being misinterpreted by Shivsena Thackeray Group, Eknath Shinde will decide; Deepak Kesarkar's warning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.