दिवसाढवळ्या फ्लॅट फोडून चोरट्यांने केला हात साफ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2020 10:17 PM2020-01-19T22:17:10+5:302020-01-19T22:17:20+5:30
फ्लॅटमधील कपाट फोडून आत ठेवलेली ३५ हजारांची रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी केली लंपास
वास्को: दिवसाढवळ््या वास्कोत असलेल्या ‘कर्मा एंम्प्रेस’ इमारतीच्या पहील्या मजल्यावर असलेल्या फ्लॅट चे कुलूप फोडून अज्ञात चोरट्यांनी आत असलेली ३५ हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली. या फ्लॅट मध्ये राहणारी रश्मी आमोरीन रविवारी (दि.१९) दुपारी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या मुलांसहीत घरातून गेल्यानंतर संध्याकाळी ६.३० च्या सुमारास परतली असता तिच्या फ्लॅटमध्ये चोरी झाल्याचे उघड झाले. वास्को पोलीसांना या चोरीची माहीती मिळताच त्यांनी श्वान पथक तसेच ठसे तज्ञांच्या मदतीने येथे रात्रीच्या वेळी पंचनामा केला.
वास्को पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार रविवारी दुपारी १.३० ते संध्याकाळी ६.३० च्या दरम्यान सदर चोरीचा प्रकार घडला. वास्कोत असलेल्या ‘कर्मा एंम्प्रेस’ इमारतीच्या पहील्या मजल्यावर राहणारी रश्मी आमोरीन व त्याची मुले एका कार्यक्रमासाठी गेली होती. यानंतर पुन्हा ती आपल्या मुलांसहीत घरी परतली असता तिच्या फ्लॅटच्या मुख्य दरवाजाचे कुलूप अज्ञातांनी फोडून आत प्रवेश केल्याचे तिला आढळून आले. यानंतर तीने आत तपासणी केली असता घरात असलेले कपाट चोरट्यांनी फोडून आत ठेवलेली ३५ हजाराची रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचे आढळून आले. सदर प्रकरणाबाबत नंतर तीने पोलीसांना माहीती दिली. पोलीसांनी त्वरित घटनास्थळावर श्वान पथक तसेच ठसे तज्ञांच्या मदतीने पंचनामा केला. रश्मी हीच्या घरात काही सोन्याचे ऐवज होते, मात्र ते चोरट्यांच्या नजरेस आले नसल्याने सुदैवाने सदर ऐवज चोरी होण्यापासून वाचल्याची माहीती पोलीस सूत्रांनी दिली. वास्कोत काही काळानंतर पुन्हा एकदा दिवसा ढवळ्या चोरी होण्याचा प्रकार घडल्याने याबाबत नागरीकात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वास्को पोलीस सदर चोरी प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.