‘दयानंद’चे १६ हजार बोगस लाभार्थी
By Admin | Published: September 15, 2015 02:32 AM2015-09-15T02:32:41+5:302015-09-15T02:32:52+5:30
पणजी : दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेच्या लाभार्थींची संख्या ९६ हजार ३२७ झाली आहे. सरकारने या योजनेअंतर्गत २ हजार ११५ कोटी रुपये ज्येष्ठ नागरिकांना वितरित केले.
पणजी : दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेच्या लाभार्थींची संख्या ९६ हजार ३२७ झाली आहे. सरकारने या योजनेअंतर्गत
२ हजार ११५ कोटी रुपये ज्येष्ठ नागरिकांना वितरित केले. १६ हजार बोगस लाभार्थींची नावे वगळली असून त्यांच्याकडून १४ कोटी रुपये वसूल केले आहेत. २0१५-१६ हे वर्ष दयानंद सामाजिक सुरक्षा योजना वर्ष म्हणून साजरे केले जाईल. यानिमित्त येत्या २ आॅक्टोबर रोजी कला अकादमी संकुलात दुपारी ३ वाजता विशेष समारंभ आहे. प्रत्येक तालुक्यातील १0 मिळून एकूण १२0 प्रथम लाभार्थींना या वेळी समारंभात गौरविण्यात येणार आहे. समाजकल्याणमंत्री महादेव नाईक यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, तसेच मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या हस्ते हा गौरव होईल. २ आॅक्टोबर २00१ साली भाजपचेच सरकार असताना ही योजना सुरू झाली. ज्येष्ठ नागरिकांसह २८,७५५ एकट्या महिला, १0,४0६ अपंग, तसेच ११३ बेवारस मुले यांचा लाभ घेत आहेत. ज्येष्ठांना महिना २ हजार रुपये मानधन या योजनेंतर्गत दिले जाते. ४0 टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व असल्यास महिना २ हजार रुपये आणि ९0 टक्क्यांपेक्षा अधिक अपंगत्व असल्यास महिना ३५00 रुपये मानधन दिले जाते. बेवारस मुलांसाठीचे मासिक मानधन ७५0 रुपयांवरून २ हजार रुपयांपर्यंत वाढविले आहे, अशी माहिती नाईक यांनी दिली. पती-पत्नी दोघेहीजण किंवा एकच व्यक्ती दोन ठिकाणी लाभ घेत असल्याचे आढळल्याने गेल्या वर्षी १६ हजार लाभार्थींची नावे वगळली आणि त्यांच्याकडून १४ कोटी रुपये वसूलही केले. सरकारी खात्यात नोकरी करत असतानाही या योजनेचा लाभ घेणाऱ्या १२५ जणांची नावे वगळली आणि त्यांच्याकडूनही वसुली केली. (प्रतिनिधी)