पणजीत कुजलेल्या स्थितीत आढळला मृतदेह; पोलिसांची घटनास्थळी धाव
By पूजा प्रभूगावकर | Updated: October 13, 2023 13:37 IST2023-10-13T13:36:49+5:302023-10-13T13:37:30+5:30
या परिसरात मृतदेह असल्याची कुणीतरी माहिती पोलिसांना दिल्यानंतर पणजी पोलिस घटनास्थळी दाखल झाले

पणजीत कुजलेल्या स्थितीत आढळला मृतदेह; पोलिसांची घटनास्थळी धाव
पणजी: पाटो पणजी येथे शुक्रवारी एका अज्ञात व्यक्तीचा कुजलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. सदर मृतदेह हा एका पुरुषाचा आहे. पाटो परिसरात असलेल्या एका जुन्या पेट्रोलपंच परिसरात हा मृतेदेह आढळून आला. सदर मृतदेह हा अत्यंत कुजलेल्या स्थितीत असल्याने त्यातून दुर्गंधी येत होती.
या परिसरात मृतदेह असल्याची कुणीतरी माहिती पोलिसांना दिल्यानंतर पणजी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेचा पंचनामा पोलिसांनी केला असून या प्रकरणाची नोंद ही अनैसर्गिक मृत्यू अशी केली आहे. सदर मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नसून तो बांबोळी येथील गोमेकॉत उत्तरणीय तपासणीसाठी पाठवला आहे. मृतदेहावरीच शवविच्छेदानाच्या अहवालानंतरच मृत्युचे नमेके कारण स्पष्ट होईल असे पोलिसांनी सांगितले.दरम्यान याप्रकरणी पणजी पोलिस पुढील तपास करीत आहे.